चिखलदरा : तालुक्यातील डोमा आश्रमशाळेत महिलांसाठी कोविड सेंटर दोन महिन्यापासून सुरू आहे. तेथे कार्यरत महिला डॉक्टर व कर्मचारी राहत आलेली खोली मुख्याध्यापिकेकडून खाली करण्यास दबाव व अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रार तहसीलदार व प्रकल्प अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत डोमा येथील शासकीय आश्रम शाळेतील वसतिगृहात केवळ महिलांसाठी सेंटर उघडण्यात आले आहे. कार्यालयात डॉक्टरांना तेथीलच एक खोली राहण्यासाठी देण्यात आली. परंतु संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका व काही शिक्षकांनी डॉक्टर व कर्मचारी राहत असलेली खोली खाली करण्यासाठी शुक्रवारी डॉ. स्वाती राठोड व कर्मचारी महिलांना दमदाटी करीत अपमानास्पद वागणूक दिली. तशी तक्रार काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी तहसीलदार माया माने, धारणी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना केली आहे.
बॉक्स
वादग्रस्त डोमा आश्रमशाळा
कोरोनामुळे सर्वत्र शाळा बंद आहेत. विद्यार्थीसुद्धा नाहीत. दुसरीकडे शासनातर्फे येथे केवळ महिलांसाठी कोविड सेंटर उघडण्यात आले. २५ पेक्षा अधिक व महिलांवर येथे उपचार करण्यात आला. असे असताना आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षकांकडून कुठलेच सहकार्य न करता सूड भावनेतून सेंटर बंद करण्याचा प्रकार सुरू आहे. यापूर्वीसुद्धा याच आश्रम शाळेत २५ ते ३० भव्य वृक्ष तोडण्यात आले होते. त्यामुळे हीच आश्रमशाळा सतत वादग्रस्त ठरली आहे.
कोट
डोमा येथे महिलांसाठी कोविड सेंटर आश्रमशाळेत सुरू आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची राहण्याची खोली अपमानास्पद पद्धतीने खाली करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक दबाव आणत आहे, तशी तक्रार वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाला करण्यात आली आहे.
- आदित्य पाटील,
वैद्यकीय अधिकारी
काटकुंभ प्रा आरोग्य केंद्र
===Photopath===
200621\1514-img-20210619-wa0173.jpg
===Caption===
डॉ मा आश्रम शाळा फोटो