वरूड : शेती व प्लॉट खरेदीच्या नावावर येथील चौघांची सुमारे २८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. आरोपी महिलेच्या जामिनावर १२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. शहरातील बहुचर्चित फसवणूक प्रकरणात २८ लाखांनी तक्रारकर्त्यांची फसवणूक झाली
आहे. आरोपींनी गुन्हा दाखल झाल्याबरोबर अटकपूर्व जामिनाकरिता न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अटी-शर्तींवर दीपक शिवनारायण बटवाडा आणि प्रवीण धरमठोक (दोन्ही रा. वरूड) या दोन आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला. ठाणेदार श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी हे तपास
करीत आहेत.