अमरावती : पशुसंवर्धन विभागाच्या शेळी मेंढी वाटप गटात विधवा, घटस्फोटित व कोरोनामुळे अनाथ झालेल्या व्यक्ती, कुटुंबांचा समावेश व्हावा, अशी मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे.
दुग्ध व पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर शेळी, मेंढी गटवाटप करण्यात येते. या योजनेत लाभार्थ्यांची निवड करताना प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. मात्र, त्यात विधवा, घटस्फोटित महिला, तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या व्यक्ती, कुटुंबाचा समावेश नाही. या घटकांना या योजनेचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना या संकटकाळात आधार मिळू शकेल.त्यामुळे विधवा, घटस्फोटित आणि कोरोनामुळे अनाथ झालेल्या कुटुंब, व्यक्तींचा समावेश शेळी मेंढी वाटप योजनेत करण्याची विनंती पालकमंत्र्यांनी पशुसंवर्धन मंत्र्यांना केली आहे