लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : व्हॅलेंटाइन म्हणजे प्रेमाचे प्रतीक. आपले प्रेम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एका जोडप्याने शिरजगाव पोलिसांना लग्न करायचे असल्याचे सांगितले आणि व्हॅलेंटाइन डेला ते लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांना आयुष्यभराच्या प्रवासात यंदाचा व्हॅलेंटाइन लक्षात राहील असा जुळून आला आहे.चांदूर बाजार तालुक्यातील सर्फापूर कल्होडी येथील दिनेश आणि दीपा यांचे एकमेकांवर प्रेम होते. प्रेमाच्या आणाभाका घेत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाला घरच्यांचा विरोध होईल. त्यातून वाद निर्माण होतील, अशी धास्ती त्यांना सतावत होती.सर्फापूर कल्होडी येथील पोलीस पाटील विनोद घुलक्षे, रमेशपंत घुलक्षे, अशोक घुलक्षे, बाळुपंत खुजे, गोलू ठाकरे, विकी मनोहरे आदींना ही माहिती मिळताच त्यांनी प्रेमवीर दिनेश सुकलाल उईके व प्रेमिका दीपा सुरेश वाडीवा यांच्यासह त्यांच्या नातलगांना घेऊन शिरसगाव पोलीस स्टेशन गाठले. हकीकत सांगितली.दोघेही वयाने सज्ञान असल्याने मर्जीने लग्न करीत असल्याचे त्यांनी पोलीस ठाण्यात लिहून दिले. यानंतर ठाण्यातच हार-तुरे आणून दोघांनी एकमेकांच्या गळ्यात टाकले. आप्तेष्टांसह सर्फापूर कल्होडी येथील प्रतिष्ठित गावकरी, पोलीस अधिकारी-कर्मचाºयांच्या उपस्थितीत शुभमंगल उरकले.मिठाई आणून ती पोलीस ठाण्यात वितरित करण्यात आली. १४ फेब्रुवारी या प्रेमदिनी दोन प्रेमवीरांचे मिलन झाले आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी उपस्थित पोलीस कर्मचारी व आप्तेष्टांसह गावकºयांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘नांदा सौख्य भरे’ म्हणत सर्वा$ंनी आशीर्वाद दिलालग्नाच्या गाठी वरूनच जुळून येतात, या वाक्याभोवती अनेक कथा गुंफण्यात आल्या तसेच चित्रपटांमध्ये दाखविण्यात आल्या. चांदुर बाजार तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातही हेच घडले. व्हॅलेंटाईन डे रोजी झालेला हा विवाह प्रेमवीरांसह नागरिकांना लक्षात राहणारा ठरला.
शिरजगाव ठाण्यात प्रेमवीर अडकले लग्नाच्या बेडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:16 PM
व्हॅलेंटाइन म्हणजे प्रेमाचे प्रतीक. आपले प्रेम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एका जोडप्याने शिरजगाव पोलिसांना लग्न करायचे असल्याचे सांगितले आणि व्हॅलेंटाइन डेला ते लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांना आयुष्यभराच्या प्रवासात यंदाचा व्हॅलेंटाइन लक्षात राहील असा जुळून आला आहे.
ठळक मुद्देजिवापाड प्रेम करणाऱ्या दीपा, दिनेशने थाटला संसार