लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरसीपीच्या कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत रायफल घेऊन पोलीस आयुक्तालयात गोंधळ घातल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेच्या अनुषंगाने शहर आयुक्तालय हद्दीतील मद्यपी पोलिसांची यादीच तयार केली जाणार असून, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सर्व ठाणेदारांना तसे निर्देश दिले आहेत. मद्यपी पोलिसांची मानसिक स्थिती व कौटुंबिक कलह पाहता, त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.राखीव पोलीस दलातील राजेश चौधरी नामक कर्मचाºयाने मद्यधुंद अवस्थेत रायफल घेऊन शुक्रवारी पोलीस आयुक्तालय गाठून गोंधळ घातला. गाडगेनगर पोलिसांनी राजेश चौधरीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चौधरी यांच्या अशा प्रकारच्या कृत्याची चौकशी सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे.राजेश चौधरी हे कौटुंबीक कलहामुळे मानसिक तणावात होते. अशा स्थितीत मद्यप्राशन करून त्यांनी गोंधळ घातल्याचे निदर्शनास आले आहे. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील यापूर्वीही असे काही प्रकार घडले असून, अशा मद्यपी पोलिसांच्या कृत्यामुळे पोलिसांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मद्यपी पोलिसांची यादी तयार करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे प्रयत्न आता पोलीस आयुक्तांनी चालविले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत ठाणेदारांना मद्यपी पोलिसांची यादी देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जे पोलीस मद्यप्राशन करून उद्धट वर्तणूक करतात, रागीट स्वभावाचे आहेत, मानसिक तणावात येऊन ते कोणतेही पाऊल उचलू शकतात, अशा पोलीस कर्मचाºयांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करा, असे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. अशा मद्यपी तथा अग्रेसिव्ह पोलिसांना पोलीस विभागातर्फे समुपदेश केले जाणार असून, त्याच्या मानसिक तणावातून सोडविण्याचे प्रयत्न पोलीस आयुक्त करणार आहे.पोलिसांचे कामकाजातील ताणतणावावर मद्यपान हा पर्याय नाही. दुर्दैवाने काही जण त्याच्या आहारी गेले आहेत. अशा तणावग्रस्त, व्यसनी पोलिसांची यादी तयार करून समुपदेशन करू.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त
मद्यपी पोलिसांची यादी होणार तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:38 PM
आरसीपीच्या कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत रायफल घेऊन पोलीस आयुक्तालयात गोंधळ घातल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेच्या अनुषंगाने शहर आयुक्तालय हद्दीतील मद्यपी पोलिसांची यादीच तयार केली जाणार असून, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सर्व ठाणेदारांना तसे निर्देश दिले आहेत.
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे ठाणेदारांना निर्देश : कौटुंबिक कलहासाठी समुपदेशन