लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्या परिषदेच्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन आता महाविद्यालय स्तरावर होत आहे. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३८६ महाविद्यालयांनी परीक्षांचे वेळापत्रक तयार केले आहे. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान महाविद्यालयांमध्ये परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे.विद्यापीठाने परीक्षांची कार्यप्रणाली जाहीर केली आहे. त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वे महाविद्यालयांना पाठविली आहेत तसेच विद्यापीठाने महाविद्यालय स्तरावर होऊ घातलेल्या ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नपत्रिका ते मूल्यांकनाचा खर्च निश्चित केला आहे. महाविद्यालयांना परीक्षा संचालनाचा मोबदला विद्यार्थिसंख्येनुसार दिला जाणार आहे. गत दोन दिवसांपासून काही महाविद्यालयांनी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बुधवारपासून सर्वच महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षासह अन्य सत्रांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयात कोरोना नियमावलीचे पालन करूनच परीक्षांचे संचलन करावे लागणार आहे. प्राचार्य, केंद्राधिकारी यांना विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि शारीरिक अंतर ठेवण्याबाबत दक्षता बाळगावी लागेल, असे विद्यापीठाने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविज्ञान, आंतरशाखीय विद्या शाखा आणि वाणिज्य व व्यवस्थापन अशा चारही शाखांच्या परीक्षा होणार आहेत.उन्हाळी २०२० परीक्षेकरिता पात्र विद्यार्थी, परीक्षा प्रक्रियेचा कालावधी, परीक्षा पद्धती, कार्यपद्धती, मूल्यांकन व गुणदानाची पद्धत, परीक्षा निकाल जाहीर पद्धत, विद्यार्थ्यांची सुरक्षा व आरोग्य हित याबाबत गाईडलाईन जारी करण्यात आली आहे.महाविद्यालयांनी तयार केलेले परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठात पाठविल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.महाविद्यालयांना ऑफलाईनसाठी मानधनविद्यापीठाने ऑफलाईन परीक्षेसाठी महाविद्यालयांना सेवेनुसार मानधन निश्चित केले आहे. यात विद्यार्थिसंख्येला प्राधान्य देण्यात आले आहे. १०० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास केंद्राधिऱ्यांना ५०० रुपये, पर्यवेक्षक प्रतिपाळी १०० रुपये, लिपिक प्रतिदिन २०० रुपये, शिपाई १५० रुपये, वॉटरमन प्रतिपाळी ५० रुपये, सफाईगार प्रतिदिन १५० रुपये, प्रति उत्तरपत्रिकांचे मू्ल्यांकन ५ रुपये, निर्जंतुकीकरण व्यवस्था ५००, ७५० व १००० रुपये विद्यार्थिसंख्येनुसार दिले जाणार आहेत. प्रश्नपत्रिकांची छायाप्रत प्रति विद्यार्थी, प्रति पेपर ३ रुपये अशी निश्चित करण्यात आले आहे.
महाविद्यालयांचे वेळापत्रक तयार आजपासून नियमित परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 5:00 AM
विद्यापीठाने परीक्षांची कार्यप्रणाली जाहीर केली आहे. त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वे महाविद्यालयांना पाठविली आहेत तसेच विद्यापीठाने महाविद्यालय स्तरावर होऊ घातलेल्या ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नपत्रिका ते मूल्यांकनाचा खर्च निश्चित केला आहे. महाविद्यालयांना परीक्षा संचालनाचा मोबदला विद्यार्थिसंख्येनुसार दिला जाणार आहे. गत दोन दिवसांपासून काही महाविद्यालयांनी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे.
ठळक मुद्दे२ नोव्हेंबरपर्यंत नियोजन : विद्यापीठाकडून मार्गदर्शक सूचना जारी