अमरावती : शासनाने जाहीर केलेल्या कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने नियोजन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात विस्तार अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक गावातील कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेण्यात येणार आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून तीन जणांची निवड करून त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे पंचायत विभागाचे नियोजन आहे. यानुसार ज्या तालुक्यात कोरोनाचा संसर्ग अधिक होता. आता मात्र, तालुक्यातील एकही गावे कोरोनामुक्त आढळून आले नाही. अनेक गावांनी कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळविले. या कामाला प्रोत्साहन मिळावे, तसेच गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत, याकरिता ग्रामविकास विभागामार्फत ‘कोरोना मुक्त गाव‘ स्पर्धा जाहीर केली आहे. यासाठी गावाला रोख पारितोषिक दिले जाणार आहे. प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना पारितोषिके दिली जाणार आहे. याशिवाय लेखाशीर्ष २५१५ व ३०५४ या योजनेला प्राधान्य देऊन तेवढ्या रकमेची विकासकामे त्या गावात मंजूर केली जाणार आहे. स्पर्धेच्या २२ निकषावर गुणांकन होणार आहे. ग्रामपंचायत विभागाची नियोजन करत आहे. यासंदर्भात सर्व विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यापर्यंत विविध तालुक्यांतील चांगली काम केलेल्या तीन गावांची निवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनामुक्त गाव स्पर्धेत काेरोनामुक्त गावांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
बॉक्स
गुणांकनाचे निकष
कोरोनामुक्त समितीची व पथकाची निर्मिती करणे, कोरोनाबाधित गावांचे सर्वेक्षण कॉन्ट्रॅक्ट टेसिंग, गावपातळीवर अँटिजेन टेस्ट सुविधा, पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात तत्काळ दाखल करणे, लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवण्याकरिता वाहनाची व्यवस्था करणे, विलगीकरण केंद्रातील सोयी सुविधा, सहकारी संस्था, बचत गटांचा सहभाग कोरोना बाधितांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रम शासकीय कामात लोकसहभाग आदी २२ निकषांचे मूल्यमापन होणार आहे.