शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

अमरावती विद्यापीठाचा केंद्राकडे नव्याने डीपीआर, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाकडे सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 4:11 PM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढील १० वर्षांचा गुणवत्तापूर्ण, शैक्षणिक आणि भौतिक विकासाने परिपूर्ण विकास आराखडा तयार केला आहे. १ हजार २१८ कोटी १३ लाख २२ हजार रुपयांची मागणी असलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) कडे पाठविला आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढील १० वर्षांचा गुणवत्तापूर्ण, शैक्षणिक आणि भौतिक विकासाने परिपूर्ण विकास आराखडा तयार केला आहे. १ हजार २१८ कोटी १३ लाख २२ हजार रुपयांची मागणी असलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) कडे पाठविला आहे. अ‍ॅकेडमिक एक्सलन्स अ‍ॅन्ड प्लॅनिंग समितीने हा डीपीआर तयार केला, हे विशेष.रूसाने राज्यातील सर्व विद्यापीठांना संस्था विकास योजनेंतर्गत डीपीआर मागविले होते. त्याअनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीने हा  डीपीआर अतिशय कमी अवधीत तयार करण्याची किमया केली आहे. पुढील १० वर्षांत विद्यापीठाला काय अपेक्षित आहे, याचा वेध घेऊन समितीने डीपीआर तयार केला असून, शैक्षणिक, भौतिक, वसतिगृहे, वाचनालये, संशोधनासाठी पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्य अशा सर्वंकष बाबीचा यात समावेश करण्यात आला आहे. नव्या डीपीआरमध्ये विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी रूसा प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्यांकन परिषदेने (नॅक) ठरवून दिलेल्या मापदंडानुसार विद्यापीठाने नवा डीपीआर तयार केला आहे. यात शैक्षणिक, मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना, विस्तार, पायाभूत सुविधा, शैक्षणिक संसाधने, विद्यार्थी आधार, प्रगती, नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन तसेच संस्थात्मक मूल्य विकासाचा समावेश आहे. नव्याने तयार केलेला डीपीआर रूसाकडे पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मान्यता मिळताच विद्यापीठाचा झपाट्याने विकास करता येईल, असे संकेत आहेत.या समितीने तयार केला डीपीआरकुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीने डीपीआर तयार केला आहे. यात प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, माजी कुलगुरू विलास सपकाळ, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, ओमनवार, व्ही.एस. चौबे, राजेश सिंह, एस.एफ.आर. खादरी, मनीषा काळे व विद्यापीठ विकास विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे यांचा समावेश आहे.तीन टप्प्यांमध्ये विभागला प्रस्तावयोजना                संख्या        आवश्यक निधीलहान (शॉर्ट टर्म)     ४४         १०३ कोटी ४४ लाख ३० हजारमध्यम (मीडियम टर्म)  १३१       ६०० कोटी ४६ लाख ६८ हजारमोठे  (लाँग टर्म)      ५३         ५१४ कोटी २२ लाख २४ हजार 

भविष्याचा वेध घेत नव्याने डीपीआर तयार केला आहे. शैक्षणिक, सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक बाबीच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. विद्यार्थिकेंद्रित डीपीआर असल्याने रूसा या प्रस्तावाला नक्कीच मान्यता देईल. हा प्रस्ताव मान्य झाल्यास अमरावती विद्यापीठ जागतिक पातळी गाठेल, यात दुमत नाही.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Amravatiअमरावती