जिल्ह्यातील चार नगरपंचायतींमध्ये पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. अपेक्षेनुसार तिवसा येथे काँग्रेस, भातकुलीत युवा स्वाभिमान, तर धारणी येथे राष्ट्रवादी-शिवसेना युतीने विजय मिळविला. नांदगावात मात्र बंडाळी होऊन नगराध्यक्षपद भाजपकडे गेले आहे.तिवस्यात अध्यक्ष वैभव वानखडे उपाध्यक्षपदी संध्या मुंदानेतिवसा : येथील नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा नगरपंचायतवर फडकला. नगरपंचायत उपाध्यक्ष असलेले वैभव सतीशराव वानखडे यांना अध्यक्षपदी बढती मिळाली, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या संध्या किसन मुंदाने यांनी बाजी मारली. १७ सदस्यीय नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे १०, शिवसेना ४, राष्ट्रवादी काँग्रेस १, माकप १ व एक अपक्ष आहे. सर्वसाधारण नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेने अनिल थूल यांचा अर्ज होता. वैभव वानखडे यांना ११, तर अनिल थूल यांना सहा मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी संध्या मुंदाने यांना ११, तर शिवसेनेच्या जयश्री गुल्हाने यांना सहा मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एसडीओ विनोद शिरभाते, तर सहायक म्हणून मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी काम पाहिले. विजयाची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आ. ठाकूर यांनी तिवसा पेट्रोल पंपवर नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे स्वागत केले. यावेळी माजी जि.प. सभापती दिलीप काळबांडे, बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित बोके, पंकज देशमुख, रीतेश पांडव उपस्थित होते.नांदगावात उपाध्यक्षपद शिवसेनेलानांदगाव खंडेश्वर : येथे भाजपचे संजय पोफळे व शिवसेनेच्या प्रीती नीलेश इखार हे प्रत्येकी नऊ मते घेऊन अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी विराजमान झाले. काँग्रेसचे अक्षय पारसकर व फिरोजखाँ अहमदखाँ यांना आठ मते मिळाली.पहिल्या कार्यकाळात काँग्रेसच्या हाती नगरपंचायतची सत्ता होती. तीन सदस्य आपल्याकडे वळविण्यात भाजपश्रेष्ठी यशस्वी झाले. हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ व काँग्रेसच्या एका सदस्याने संजय पोफळे यांच्या बाजूने मतदान केले. हाच कित्ता प्रीती इखार यांची उपाध्यक्षपदी निवड करतानाही गिरविला. शिवसेना सदस्यांना वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. ठाणेदार मगन मेहते यांनी बंदोबस्त ठेवला. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार चेतन मोेरे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी काम पाहिले.धारणीत शैलेंद्र जांबेकरधारणी : नगरपंचायतीवर अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शैलेंद्र जांबेकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील चौथमल यांची निवड झाली. निवडणुकीकरिता पीठासीन अधिकारी म्हणून धारणीचे उपविभागीय अधिकारी राहुल कर्डिले यांना जिल्हाधिकाºयांनी नियुक्त केले होते. अध्यक्षपदाकरिता राष्ट्रवादीचे शैलेंद्र जांभेकर व भाजपचे रवि पटेल यांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी जांभेकर यांना १२ मते मिळाली, तर पटेल यांना चार मते मिळाली. उपाध्यक्षपदाकरिता शिवसेनेचे सुनील चौथमल यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड झाली. नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ८, काँग्रेस ३, भाजप ४, शिवसेना २ सदस्य आहेत.भातकुलीत पवार, कासट यांची बाजीभातकुली : येथील नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत युवा स्वाभिमान संघटनेने वर्चस्व राखले. नगराध्यक्षपदी रेखा दिनेश पवार व उपाध्यक्षपदी गिरीश कासट यांची निवड झाली.नगराध्यक्षपदासाठी रेखा पवार व काँग्रेसच्या शालिनी भोपसे यांच्या लढत झाली. रेखा पवार यांना १०, तर शालिनी भोपसे यांना पाच मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी गिरीश कासट आणि काँग्रेसचे अ. रफिक अ. शेखजी यांच्यात लढत झाली. गिरीश कासट यांना १०, तर अ. रफिक यांना पाच मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एसडीपीओ इब्राहिम चौधरी, तहसीलदार आडे यांनी काम पाहिले.
सत्ताधाऱ्यांनी राखले अध्यक्ष-उपाध्यक्षपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:55 PM
जिल्ह्यातील चार नगरपंचायतींमध्ये पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. अपेक्षेनुसार तिवसा येथे काँग्रेस, भातकुलीत युवा स्वाभिमान, तर धारणी येथे राष्ट्रवादी-शिवसेना युतीने विजय मिळविला. नांदगावात मात्र बंडाळी होऊन नगराध्यक्षपद भाजपकडे गेले आहे.
ठळक मुद्देनगरपंचायत निवडणूक : नांदगाव खंडेश्वर येथे बंडाळी, नगराध्यक्षपद भाजपकडे