नियमांची ऐसीतैसी : लोकमतच्या वृत्ताने खळबळचिखलदरा : तालुक्यातील काटकुंभ, चुरणी परिसरात सुरू असलेल्ळा पंतप्रधान ग्राम सडक योजनेत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी नियमांची वाट लावल्याचे चित्र आहे. मुरूम ऐवजी माती व खडीकरणासाठी ब्लास्टिंगच्या चुरा टाकल्या जात आहेत.चिखलदरा तालुक्यात कोट्यवधी रूपये खर्चून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कामे सुरू आहेत. मध्यप्रदेशातील कंत्राटदार मागील अनेक वर्षांपासून याच परिसरातील कामे करतो. केंद्रापर्यंत आपले संबंध नेत्यांसोबत असल्याने नियमाची पायमल्ली दिवसाढवळ्या सुरू आहे. संबंधित अधिकारी कोट्यवधी रूपयांच्या कामावर फिरकतच नसल्याचे निकृष्ट कामाचा दर्जा सांगीत आहे. माती की मुरूमपंतप्रधान ग्रामसडक योजनेत खडीकरण व डांबरीकरणाचे काम पाचडोंगरी ते खंडूखेडा आदी ठिकाणी ग्लास फायबर मिश्रीत रस्त्याची सुधारणे करण्याचा एकमेव फलक गांगरखेडा गावात प्रवेश करताच दिसून येतो. याच फलकावर नजर टाकली तर काम कश्या दर्जाचे असावे हे ठळकपणे लिहिले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाचा दर्जा वेळेपूर्वीच जिर्ण होणारा आहे. डोमा गाव टेकडीवरील रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला मुरुम की लाल माती हेच कळायला मार्ग नाही. तर दुसरीकडे विहिरीच्या ब्लास्टींगचे व नजीकच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून जेसीबीने खोदकाम करीत गौण खनिजाची चोरी मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळमंगळवारी ‘लोकमत’ने ‘पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे मेळघाटात तीनतेरा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच संबंधित अधिकारी व कंत्राटदाराचे धाबे दणाणले. मोठ्या प्रमाणात निकृष्ठ कामाची सावरासावर करतानाचे चित्र होते. अमरावती मुख्यालयी वाताणुकुलीत कक्षात बसलेल्या अधिकाऱ्यांना ‘लोकमत’च्या वृत्तामुळे घाम आला. ते आपल्या मेळघाटातील ------ कामावरील कामगारांकडून कामाची माहिती घेत होते.नियमाची ऐसीतैसीपंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत संबंधित कंत्राटदाराने संपूर्ण नियमच धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे. रेती ऐवजी खदानीतील बारीक गिट्टीची डस्ट वापरणे, लोखंडी सळी अगदी कमी व्यासाची (जाडी) ठळक ठिकाणी वापर करणे, इतर ठिकाणी पुलाच्या व रपट्यांच्या कामात वापर न करणे, व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात अवैध वृक्षतोड व जेसीबीने गौण खनिजाची चोरी करणे यावरही कळस म्हणजे नियमानुसार रस्त्याच्या बाजूला असलेली साईड पटरी खडीकरण व डांबरीकरणापूर्वीच भरण्यात आली. त्यामध्ये प्रत्यक्षात डांबरीकरणाच्या रस्त्याची जाडी लपविण्याचा व निकृष्ट काम करण्याचा नवीन शोध लावण्यात आला आहे. अधिकारी बोलेना?पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माहितीसाठी संबंधित अधिकारी चामलवार यांच्याशी संपर्क साधला असता आपण चार दिवसापूर्वीच यवतमाळचे कार्यकारी अभियंता धोत्रे कडे पदभार दिल्याचे सांगण्यात आले. धोत्रे यांच्याशी संपर्क केला तेव्हा आपणाला काहीच माहित नाही. आपण प्रभारी असून यवतमाळला असल्याचे सांगितले. संबंधित वानखडे नामक अधिक असून त्यांचा क्रमांक नाही म्हणीत एकप्रकारे अंगावर निकृष्ट कामाचा कलंक लागण्यापेक्षा घोंगडे झटकले.
पंतप्रधान योजनेत मुरुमाऐवजी माती व ब्लास्टिंगचे दगड
By admin | Published: April 08, 2015 12:25 AM