जिल्हा परिषद : प्रशासनाने तातडीने घेतली दखल अमरावती : जिल्हा परिषदेतील भाजप या विरोधी पक्षासह अन्य पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी खातेवाटपाच्या सभेनंतर मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासमोर विविध समस्या मांडून त्या तातडीने निकाली काढण्याची मागणी केली. सीईओंनी विरोधी पक्षाच्या २६ सदस्यांचे मुद्दे बारकाईने जाणून घेत त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत.जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या महिला सदस्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात यावा, पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजूर इमारतीची निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश देण्यात यावा, याशिवाय मोर्शी पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचा मुद्दा सुद्धा निकाली काढावा, स्वीय सहायकाची नियुक्ती रद्द कराअमरावती : याशिवाय आरोग्यसेवक पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची अध्यक्षांच्या स्वीयसहायकांची नियुक्ती रद्द करावी, आदी मागण्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. संबंधित कर्मचाऱ्यांची प्रशासकीय माहिती सादर करण्याचे निर्देश सीईओंनी प्रशासनाला दिले. महिला सदस्यांना बसण्यासाठी त्वरित कक्ष उपलब्ध करण्यात येईल, असे आश्वासन सीईओंनी दिले. यावेळी सदस्य रविंद्र मुंदे, प्रताप अभ्यंकर, प्रवीण तायडे, विजय काळमेघ, सुनील डीके आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
‘सीईओं’च्या दरबारात विरोधकांनी मांडल्या समस्या
By admin | Published: April 19, 2017 12:07 AM