लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी त्वरेने मास्क उपलब्ध व्हावेत, यासाठी येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी सात दिवसांत ५० हजार मास्कची निर्मिती केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मिशनमोडवर कारागृह प्रशासनाने सुती कापडापासून मजबूत मास्कची निर्मिती केल्याची माहिती आहे.राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क उपलब्ध व्हावे, यासाठी कारागृह प्रशासनाकडे ही जबाबदारी सोपविली होती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांना मास्क निर्मितीबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने कारागृहातील शिवणकाम विभागाकडे मास्क निर्मितीची जबाबदारी दिली होती. बंदीजनांनी सात दिवस शिवणकाम करून ५० हजार मास्क निर्मितीची किमया केली. जिल्हा प्रशासनामार्फत हे मास्क वितरित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस यंत्रणेला मास्क वितरित करण्यात आले. त्यानंतर आरोग्य, महसूल, अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात येणार असल्याची माहिती आहे. विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्क उपयुक्त ठरणारे आहे. कारागृह तयार झालेले हे मास्क सूती कापडापासून तयार करण्यात आले आहे. हे मास्क धुवून पुनर्वापर करता येते, अशी माहिती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने पुन्हा मास्क निर्मितीची मागणी केल्यास त्वरेने मास्क उपलब्ध करून दिले जातील, असे अधीक्षक रमेश कांबळे म्हणाले.
कारागृहात ५० हजार मास्कची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क उपलब्ध व्हावे, यासाठी कारागृह प्रशासनाकडे ही जबाबदारी सोपविली होती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांना मास्क निर्मितीबाबतच्या सूचना दिल्या होत्या.
ठळक मुद्देआदेशाचे मिशनमोडवर पालन : सुती कापडापासून मजबूत मास्क तयार