अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या विध्यार्थी संशोधन अधिवेशन अविष्कार २०१९ मध्ये प्रो. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेराच्या सात संशोधकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन प्रथम जिल्हास्तरावर करण्यात आले होते. त्यामधून निवडलेल्या स्पर्धकांना विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी बोलविण्यात आले. पुढे हे संशोधक विद्यापीठाचे प्रतिनिधित्व राज्यस्तरीय अंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेत करतील. ही स्पर्धा विविध श्रेणीत होत आहे. यामध्ये यूजी, पीजी, पीपीजी, टीएच या स्तराचे संशोधक सहभाग घेऊ शकतात.
प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रा. अमित मोहोड ( ईटी), प्रा. अमित कुमार रनित (ईटी), यांची टीएच या श्रेणीत निवड झाली. सचिन देशमुख (एमजी), मोनाली टिंगणे (एचएलएफ), मोहम्मद वजाहद नसीम (एएएच), कृणाल पनपालिया (सीएमएल) यांची पीपीजी या श्रेणीत निवड झाली. तसेच प्रणव ढाकुलकर (ईटी) या विध्यार्थ्याची पीजी श्रेणीत निवड करण्यात आली. या सर्व संशोधकांना विद्यापीठाद्वारे कलरकोट प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी नियोजानाकरिता महाविद्यालयातील रीसर्च अँन्ड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख मिर्झा बेग यांनी विद्यापीठासोबत समन्वय केले. या स्पर्धेसाठी प्राचार्य एम.एस.अली यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे, उपाध्यक्ष उदय देशमुख, कोषाध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, सन्माननीय सदस्य शंकरराव काळे, नितीन हिवसे, रागिनी देशमुख, वैशाली धांडे व पुनम चौधरी यांनी विजेत्यांचे कौतुक केले.