लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : २५ सप्टेंबरपासून ‘एमफुक्टो’ या राज्यस्तरावरील प्राध्यापकांच्या संघटनेने पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे विभागातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने शिक्षण क्षेत्राकडे केलेल्या दुर्लक्षामुळे एमफुक्टोने प्राध्यापकांच्या भरतीसह सातवा वेतन आयोग आणि विविध प्रश्नांसाठी हे आंदोलन छेडले आहे. यात नुटा आणि विभागातील सीएचबी आणि पीएचडीधारकांच्या संघटना सहभागी झाल्या आहेत.परीक्षा तोंडावर असताना प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने याचा मोठा फटका विद्यार्थी वर्गाला बसण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक मोठ्या महाविद्यालयांमध्ये केवळ काहीच प्राध्यापक शिकविण्यासाठी येत आहेत. अधिकांश महाविद्यालये सीएचबी प्राध्यापकांच्याच भरवश्यावर चालत असून त्यामुळे अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण होत आहे. शिक्षण मंचमधील प्राध्यापकांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला नसल्याने बहुतेक ठिकाणी महाविद्यालयातील कामकाज योग्यरित्या सुरू आहे. मात्र, उर्वरीत महाविद्यालयात विपरीत स्थिती पहावयास मिळत आहे. प्राध्यापक सुट्टीवर गेल्याने विद्यार्थी मात्र आता नेमके करायचे तरी काय? या विचारात आहेत. सोमवारपासून प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. येत्या काही महिन्यात परीक्षा होणार असल्याने अपुऱ्या अभ्यासक्रमाचा परिणाम होणार आहे.सरकारची आश्वासनेकायम, ठोस निर्णय नाहीगेल्या तीन वर्षांपासून आम्ही ज्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत त्यावर कुठलाही निर्णय बैठकित घेण्यात आला नाही. सरकारची तीन वर्षांपूर्वीची आश्वासने आजही कायम आहेत. त्यामुळे आता कामबंद आंदोलन अधिक तीव्र होणार असून, आता विद्यार्थी देखील पाठिंबा देत असल्याचे एमफुक्टोचे उपाध्यक्ष प्रवीण रघुवंशी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.तीन दिवसांपासून शिकविण्यासाठी एकही प्राध्यापक आले नाही. त्यामुळे महाविद्यालयात नियमित येणाºया विद्यार्थ्यांना निराश होऊन परतावे लागत आहे. यामध्ये आमचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तिढा तातडीने सोडविला न गेल्यास आम्ही विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करू.- शुभम बानुबाकोडे,विद्यार्थी, शिवाजी कला महाविद्यालय अमरावती
प्राध्यापकांच्या संपाचा महाविद्यालयांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 1:25 AM
२५ सप्टेंबरपासून ‘एमफुक्टो’ या राज्यस्तरावरील प्राध्यापकांच्या संघटनेने पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे विभागातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
ठळक मुद्देशैक्षणिक कामांवर परिणाम : अभ्यासक्रम अपूर्ण