शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

३.१३ लाख शेतकऱ्यांना १८८ कोटींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:06 PM

दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. जिल्ह्यात पाच एकराखाली शेती असलेले ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी खातेदार आहेत. त्यानुसार त्यांच्या बँक खात्यात १८७ कोटी ५१ लाख ६८ हजारांची रक्कम जमा होणार आहे.

ठळक मुद्देबजेटमध्ये तरतूद : पाच एकराखालील शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी सहा हजार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. जिल्ह्यात पाच एकराखाली शेती असलेले ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी खातेदार आहेत. त्यानुसार त्यांच्या बँक खात्यात १८७ कोटी ५१ लाख ६८ हजारांची रक्कम जमा होणार आहे.शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी पाच एकरापर्यंत शेती असणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जाण्याची घोषणा केली. ही मदत तीन टप्प्यात दिली जाणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली असली तरी सर्व स्तरांतून याबाबत प्रतिक्रीया आलेल्या आहेत.यंदा अपुºया पावसाने खरीप उद्ध्वस्त झाला अन् जमिनीतील आर्द्रतेअभावी रबी हंगामदेखील हातचा गेला. जिल्ह्यात ५० टक्क्यांवर रबीचे क्षेत्र नापेर असताना शासनाकडून दोन हजारांची मदत निश्चितच तुटपुंजी आहे. शेतीचा उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना शासनाद्वारा देण्यात येणारी मदत अल्पशी असल्याचे मत शेतकºयांनीही व्यक्त केले.शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केंद्र शासनाने यापूर्वीच केली आहे. त्या अनुषंगाने शेतकºयांचा सात-बारा कोरा करण्याच्या दृष्टीने या बजेटमध्ये काही असेल, हा मात्र भ्रम ठरला. काही ठोस उपाययोजनांबाबत अंदाजही फोल ठरला. चार वर्षांपासून दुष्काळ, नापिकी शेतकºयांच्या मागे हात धुवून लागली आहे. बाजारात हमीपेक्षाही किमान हजार रुपये कमीने शेतमाल विकावा लागत. आता शासनाद्वारे महिन्याला पाचशे रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ५२८ अल्पभूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी सहा हजार म्हणजेच १८७.५१ कोटी जमा केले जातील. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने या महिन्यात पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा होणार काय, याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे.पाच एकराखालील तालुकानिहाय शेतकरीजिल्ह्यात पाच एकराखालील शेती धारण करणारे ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी आहेत. अमरावती तालुक्यात २४ हजार ४८१, भातकुली २१ हजार २४५, नांदगाव खंडेश्वर ३० हजार ३२२, चांदूर रेल्वे १६ हजार ४४८, धामणगाव १८ हजार ७७९, तिवसा ३ हजार ४४७, मोर्शी ३२ हजार ३५२, वरूड ३१ हजार ९९, अचलपूर ३२ हजार ४५८, चांदूरबाजार ३७ हजार ६२५, दर्यापूर १९ हजार ६६२, अंजनगाव सुर्जी २५ हजार ९४५,धारणी १२ हजार १६६, चिखलदरा तालुक्यात ६ हजार ४८१ शेतकºयांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.१.७४ लाख शेतकरी वाºयावरजिल्ह्यातील पाच एकरावर शेती असणारे १ लाख ७४ हजार ७८८ शेतकºयांचा मात्र या अर्थसंकल्पात भ्रमनिरास झाला आहे. वरूड तालुक्यात ३१ हजार ४२४, चांदूर बाजार २१ हजार ९५२, दर्यापूर १९ हजार ६३५, तिवसा १९ हजार ७४, भातकुली १२ हजार ५४६, धामणगाव रेल्वे १० हजार १३६, अमरावती ९ हजार ५८३, नांदगाव खंडेश्वर ९ हजार २४५, मोर्शी ७ हजार ६४५, धारणी ७ हजार ५६५ अंजनगाव सुर्जी ७ हजार २९८, चांदूर रेल्वे ६ हजार ७४३, अचलपूर ६ हजार २६१ व चिखलदरा तालुक्यात ५ हजार ६८१ शेतकºयांना वाºयावर सोडल्याचा आरोप होत आहे.अशी मिळणार तालुकानिहाय मदतपाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकºयांना १८७.५१ कोटी दरवर्षी मिळतील. सर्वात कमी २.०४ कोटी रुपये तिवसा, तर सर्वाधिक ९९.४७ कोटी अचलपूर तालुक्यातील शेतकºयांना मिळतील. अमरावती १४.६८ कोटी, भातकुली १२.७४ कोटी, नांदगाव खंडेश्वर १८.१९ कोटी, चांदूर रेल्वे ९.८६ कोटी, धामणगाव रेल्वे ११.२६ कोटी, मोर्शी १९.४१ कोटी, वरूड १८.६५ कोटी, चांदूर बाजार २२.५७ कोटी, दर्यापूर ११.२० कोटी, अंजनगाव सुर्जी १५.५६ कोटी, धारणी ७.२९ कोटी व चिखलदरा तालुक्यात ३.८९ कोटी मिळणार आहेत.