लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि खरीपासाठी बियाणे, खत यांच्या उपलब्धतेसह मान्सून व वातावरणातील बदलाला पूरक अशी पर्यायी व बहुविध पीके घेण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे दिले.कृषी विभागातर्फे खरीप हंगाम २०१८ नियोजन सभा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, खासदार विकास महात्मे, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार रमेश बुंदिले, जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, विभागीय कृषी अधिक्षक अधिकारी विजय चव्हाळे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.तूर, सोयाबीन, कपाशी पीकांपुरती शेती मर्यादित न ठेवता करडई, सूर्यफूल, तीळ आदींचे वेगवेगळे वाण, रेशीम शेती, पिंपळी, कवठ आदी औषधी गुणधर्म असलेली झाडे अशा प्रयोगांची जोड दिली पाहिजे. पर्यायी व यशस्वी पीके, नव्या प्रयोगांबाबतची माहिती शेतक-यांपर्यंत पोहोचली पाहिजे. केवळ फ्लेक्स, पत्रके प्रसिद्ध करुन उपयोग होणार नाही. शेतक-यांपर्यंत पोहोचून त्यांना वेळोवेळी माहिती व प्रोत्साहन दिले पाहिजे, असे ते म्हणाले.असा आहे खरीप नियोजन तपशीलपाच वर्षांत कपाशीचे क्षेत्र १० टक्के कमी झाले व सोयाबीनचे तितकेच क्षेत्र वाढले.जिल्ह्यात १२.२१ लाख हे. भौगोलिक क्षेत्रापैकी लागवडीलायक क्षेत्र ७.८१ लाख हेक्टर असून, खरीपाचे क्षेत्र ७.२८ लाख हे. आहे.खारपाणपट्ट्यात जिल्ह्यातील ३५५ गावे असून, त्याचे क्षेत्र १ लाख ६० हजार हेक्टर आहे.जिल्ह्यात ४ लाख १५ हजार ८५८ खातेदारांपैकी १ लाख ४० हजार ४२३ अत्यल्पभूधारक असून, १ लाख ७१ हजार ८३२ अल्पभूधारक, तर इतर १ लाख ३ हजार ६०३ आहेत.
बहुविध पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 10:40 PM
योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि खरीपासाठी बियाणे, खत यांच्या उपलब्धतेसह मान्सून व वातावरणातील बदलाला पूरक अशी पर्यायी व बहुविध पीके घेण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे दिले.
ठळक मुद्देखरीप हंगाम नियोजन बैठक : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे निर्देश