स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : २१ फेब्रुवारीला मतदान, २३ ला मतमोजणीअमरावती : मागील आठवड्यापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबणार आहे. १९ फेब्रुवारीला रात्री १२ पर्यंत जाहीर प्रचाराला व रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराच्या वाहनाला परवानगी आहे. त्यानंतर उमेदवाराद्वारा वैयक्तिक संपर्कावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी ही निवडणूक होत आहे. यावेळी महायुती व आघाडी झाली नसल्याने सर्व पक्षाद्वारा स्वबळावर निवडणूक लढविण्यात येत आहे. त्यामुळे एकेका मतासाठी संघर्ष अटळ आहे. स्थानिक नेतृत्व व उमेदवार यांनी प्रचाराचे रान उठविले आहे. प्रचारासाठी केवळ सहा दिवसांचा अवधी मिळाला. अनेकांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले काहींच्या हाती पक्षाचा झेंडा राहिला. अनेकांनी बंडखोरी देखील केली. निवडणुकीच्या धामधुमीत अनेक आयारामांनादेखील संधी मिळाली. प्रभागरचना व आरक्षणानंतर अनेकांना सुरक्षित मतदारसंघाचा ठाव घ्यावा लागला. या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला एक हजार ७८७ केंद्रावर मतदान व तालुक्यांच्या मुख्यालयी मतमोजणी होणार आहे. किमान १० हजार कर्मचाऱ्यांवर निवडणुकीची मदार आहे. या कालावधीत दररोज राज्य निवडणूक आयुक्तांद्वारा संबंधित सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याशी व्ही. सी. द्वारे संवाद साधण्यात आला व मतदान टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात आला. अंतिम दोन दिवसांत १४ लाख व्होटर स्लिपचे वाटप करण्यात येणार आहे. २० फेब्रुवारीला मतदान केंद्रावर पार्ट्या रवाना होणार आहे. २१ ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. २३ फेब्रुवारीला सकाळी १० पासून संबंधित मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)५.३० ची 'डेडलाईन' महापालिका निवडणूक : ६२८ उमेदवारांमध्ये लढतअमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिकेच्या ८६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा जाहिर प्रचार १९ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजता संपुष्टात येणार आहे. ८ फेब्रुवारीला चिन्हवाटप झाल्यानंतर जाहीर प्रचारास सुरुवात झाली. त्यानंतर सर्वपक्षीय उमेदवारांकडून प्रचाराची रणधुमाळी उडविल्या गेली. महापालिकेचा सत्तासोपान चढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चढाओढ आहे. भाजपच्या रीता पडोळे या अविरोध निवडून आल्याने २२ प्रभागांतील ८६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी विभागीय क्रीडा संकुलात होईल.
प्रचार तोफा आज थंडावणार
By admin | Published: February 19, 2017 12:02 AM