शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

मालमत्ता करवाढीचे संकट

By admin | Published: January 18, 2016 12:09 AM

काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्ता करवाढीचे संकट नव्याने येणार आहे. करवाढीसाठी मालमत्तांचे सर्वेक्षण आणि पुन:करनिर्धारण केले जाणार आहे.

४० टक्के करवाढ : मालमत्तांचे सर्वेक्षण, पुन:करनिर्धारण होणार अमरावती : काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्ता करवाढीचे संकट नव्याने येणार आहे. करवाढीसाठी मालमत्तांचे सर्वेक्षण आणि पुन:करनिर्धारण केले जाणार आहे. या करारनाम्याला मान्यता मिळताच किमान ४० टक्के करवाढ होण्याचे संकेत आहेत. करवाढीतून महापालिकेला १० ते १२ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ७३ अन्वये शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण, पुन:करनिर्धारण कामाच्या करारनाम्याला मान्यता प्रदान करण्यात यावी, याबाबतचा प्रशासकीय प्रस्ताव विषय क्र.२२८,२५८ अन्वये १४ जानेवारी रोजी स्थायी समितीने स्थगित ठेवला. करवाढीचा विषय धोरणात्मक असल्याचे कारण पुढे करून स्थायी समितीने या विषयावर आमसभेत चर्चा करण्याचे ठरविले आहे. मात्र, स्थायी समितीने करवाढीच्या विषयाला तूर्तास स्थगिती दिली असली तरी हा विषय आमसभेत मंजूर करावाच लागेल, अशी शासन नियमावली आहे. ‘आजचे मरण उद्यावर’ असा मालमत्ता करवाढीचा विषय झाला आहे. नव्याने मालमत्तांचे सर्वेक्षण, पुन:करनिर्धारण तसेच मालमत्तांचे करयोग्य मूल्य निश्चित करण्यासाठी अपेक्षित भाडेदरात वाढ करणे, असे प्रशासनाने धोरण आखले आहे. महापालिकेत सत्तास्थानी काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंट असून करवाढ झाल्यास नागरिकांचा काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटवर सहाजिकच रोष येणार आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या बाकावर असलेल्या सेना, भाजपने करवाढीला विरोध करण्याची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरानंतर नगरसेवकांना सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, आता करवाढीचा निर्णय झाल्यास याचा फटका सत्तापक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटला बसणार हे निश्चित मानले जात आहे. महापालिकेच्या करमूल्यनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता करवाढीबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. एकदा आमसभेने या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली की नागरिकांच्या मालमत्तांना किमान ४० टक्के कर आकारणी करणे सुकर होईल, अशी रणनिती प्रशासनाने आखल्याची माहिती आहे. अचानक ४० टक्के मालमत्ता करवाढीचा विषय प्रशासनाने आणल्यामुळे नगरसेवकांची कोंडी होणार आहे.