(फोटो मेलवर आहे फोटो कॅप्शन वडापाटी येथे विविध कामांचे नियोजन करताना गावकरी अधिकारी)
चिखलदरा लोकमत न्यूज नेटवर्क
मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर माझे राज्य समृद्ध या आणि इतर विविध शासकीय उपक्रमाअंतर्गत नागापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडापाटी येथे तहसीलदार माया माने, बीडीओ जयंत बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणलोट नियोजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सर्वप्रथम आदिवासी गावकरी, तांत्रिक साहाय्यक व रोजगार सेवक यांना मग्रारोहयो, मी समृद्ध तर गाव समृद्ध या संकल्पनेतून समृद्धी बजेटवर तुषार लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. गावफेरी करण्यात आली. यामध्ये शाळा, अंगणवाडी येथे वॉल कंपाऊंड, पेविंग ब्लॉक, गावातील रस्ते, गुरांचे गोठे, वर्मी कंपोस्ट, इत्यादी कामांचा समावेश, कुटुंबनिहाय वैयक्तिक लाभाच्या योजनांचा सर्वे करून नोंदी, एक पाणलोट क्षेत्र निवड करून माथा ते पायथा नियोजनवर पाणी फाऊंडेशनचे शिवहरी टेके यांनी मार्गदर्शन केले. सी.सी.टी., वृक्षलागवड, कंपार्टमेंट बंडिंग, कंटूर बंडीग, लूज बोल्डर स्ट्रक्चर, मातीनाला बांध, शेततळे, विहीर पुनर्भरण अशा विविध उपचारांची माहिती देण्यात आली.
यानंतर चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रामध्ये तांत्रिक सहायक तसेच रोजगार सेवक व गावकरी यांच्या समस्या अडचणी कामात येणारे अडथळे इत्यादींवर कशा पद्धतीने आपण मात करू शकतो. यासाठी पंचायत समितीचे आमलेश मोरले (सहायक कार्यक्रम अधिकारी) यांनी माहिती दिली.
यानंतर पुढील नियोजनामध्ये प्रत्येक गावात गावफेरी व शिवारफेरी तसेच कुटुंबनिहाय सर्वेक्षण होऊन प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्यासाठीचा समृद्ध बजेट तयार करण्यास सुरुवात होणार आहे. यासंबंधीचे नियोजन यामध्ये करण्यात आले. या कार्यशाळेला तालुका समन्वयक पाणी फाउंडेशन वैभव नायसे, गौरव भुते व वैभव नांदगयये, मंगल जयस्वाल, जामुनकर मेटकर, पंचायत समिती तांत्रिक सहाय्यक रोजगार सेवक गावकरी उपस्थित होते.
240921\img-20210923-wa0103.jpg
समृद्धी बजेट शिवार फेरी