लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सन २०१४-१५ ते २०१६-२०१७ दरम्यान पायाभूत पदांना संरक्षण मिळाले नसल्याने संचमान्यतेतील पायाभूत पदांना संरक्षण द्या, सन २०१७-१८ ची संचमान्यता करताना तसे निर्देश शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांना द्यावेत, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांच्याकडे केली.याबाबत त्यांनी शिक्षण संचालकांना प्रस्ताव पाठविण्याबाबत आदेशीत केले असून, लवकरच यातून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. १ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयान्वये, एका गटातील विद्यार्थी संख्या कमी व इतर गटात संख्या वाढत असेल तर पदांमध्ये वाढ होईल. सदर निर्णय या वषार्तील संचमान्यतेकरिता पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणे आवश्यक आहे. अनेक शाळांमध्ये संच मान्यतेतील पदे विविध कारणांनी अतिरिक्त होत आहेत, अशा पदांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. याविषयीची चर्चा भोयर यांनी केली.शिक्षण संचालक पाठविणार प्रस्तावसन २०१४-१५ ते सन २०१६-१७ मध्ये पायाभूत पदांना संरक्षण मिळालेले नाही. पायाभूत पदांना संरक्षण लागू व्हावे, यासाठी २०१७-१८ ची संचमान्यता करताना शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांना निर्देश देण्यात यावे, अशी मागणी शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांना केली. शिक्षण संचालकांनी त्याबाबतचे प्रस्ताव कार्यालयाकडे पाठवून यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिले आहेत.
संचमान्यतेमध्ये अतिरिक्त पायाभूत पदांना संरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:05 PM
सन २०१४-१५ ते २०१६-२०१७ दरम्यान पायाभूत पदांना संरक्षण मिळाले नसल्याने संचमान्यतेतील पायाभूत पदांना संरक्षण द्या, सन २०१७-१८ ची संचमान्यता करताना तसे निर्देश शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांना द्यावेत, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांच्याकडे केली.
ठळक मुद्देशिक्षण उपसचिवांशी चर्चा : शेखर भोयर यांचा पाठपुरावा