शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

रोपवनांचे संरक्षण करा आणि पैसे कमवा; लोकाभिमुख उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:35 PM

जंगलातील वाढता ताण आणि वृक्षतोड नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने लोकाभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत. यामुळे रोपवनांचे संरक्षण, संवर्धन करणाऱ्या गावांना पैसे मिळतील. याशिवाय वनविभागातर्फे कुकिंग गॅस आणि दुधाळू गार्इंचा पुरवठा केला जाणार आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा पुढाकार गॅस आणि दुधाळू गार्इंसाठी अनुदान

गणेश वासनिकअमरावती : जंगलातील वाढता ताण आणि वृक्षतोड नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने लोकाभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत. यामुळे रोपवनांचे संरक्षण, संवर्धन करणाऱ्या गावांना पैसे मिळतील. याशिवाय वनविभागातर्फे कुकिंग गॅस आणि दुधाळू गार्इंचा पुरवठा केला जाणार आहे.राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्क्यांवर आणायचे असेल तर जंगलाप्रती आत्मियता वाढवून वनांवर आधारित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाने वन समित्या बळकट करण्यास प्रारंभ केलेला आहे. राज्यात यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचा रथ राज्यातील १५ हजार संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या खांद्यावर सोपविला जाणार आहे. राज्यातील बहुतांश रोपवने ही समितीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.ग्राम परिसर व आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत यासाठी ६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. खर्चाची मर्यादा ७० वरून ८० टक्के करण्यात आली. सद्यस्थितीत १३२२.१४ लक्ष इतका निधी वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.अमरावती, गडचिरोली, ठाणे, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिक व धुळे या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या गावातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता संरक्षित वनालगतच्या क्षेत्रातील गावांमध्ये नागरिकांना सवलतीच्या दराने बुकिंग गॅस कनेक्शन, बायोगॅस देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. अवैध वनचराई रोखण्यासाठी ग्रामस्थांना टप्प्या-टप्प्याने दुभत्या जनावरांचा पुरवठा केला जाणार आहे. मात्र वनविभागाने याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे.वृक्ष लागवड व संरक्षण प्रोत्साहनगावकºयांनी गावात लावलेली झाडे जगविणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी सात कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली. हा निधी सामाजिक संस्था, ग्रामपंचायती, बचतगट, समूहास दिला जाईल. यासाठी प्रथमच अशाप्रकारे निधी राखीव ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :forestजंगल