निवेदन : स्वस्त धान्य दुकानातून डाळीचा पुरवठा कराअमरावती : ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. राज्य शासनाने डाळींच्या किमती करू, असे आश्वासन दिले. मात्र सर्वसामान्य नागरिकांना परवडतील इतक्या कमी किंमती झाल्या नाहीत. त्यामुळे शासकीय स्वस्त धान्य दुकातातून डाळीचा पुरवठा अल्प दरात उपल्ब्ध करून द्यावा, अशी मागणी मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे माजी आमदार रावसाहेब शेखावत व शहर जिल्हाध्यक्ष संजय अकर्ते यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात दिवाळी तोंडावर आलेली असतानाच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गरीब श्रीमंत सर्वांनाच महागाईची झळ पोहोचत आहे. यंदा तूरडाळीने महागाईचा उच्चांक गाठला आहे. इतरही डाळींचे प्रचंड भाव वाझले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत साखर, मैदा, तेल व इतरही वस्तूच्या दरात वाढ होत आहे. यामुळे जनतेत नाराजी पसरली आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात जीवनावश्यक किंमतीचे दर स्थिर होते. मात्र भाजपा सरकारने कधी नव्हे ऐवढी महागाई वाढविली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला शासनाने स्वस्त धान्य दुकानातून तूर व अन्य डाळींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेसने केली आहे. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, संजय अकर्ते, मनपा काँगे्रसचे गटनेता बबलू शेखावत, माजी उपमहापौर विलास इंगोले, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर बोरकर, मनोज भेले, अभिनंदन पेंढारी, सुनीता भेले, संगिता वाघ, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष अर्चना सवाई, गजानन राजगुरे, वंदना थोरात, सीमा देशमुख, राजेश चव्हाण, सागर कलाने, सलरेश रतावा, अनिला काजी, उज्वला मोपारी, योगिता गिराशे, अख्तर मिर्झा व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शहर काँग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन
By admin | Published: October 28, 2015 12:31 AM