शहर काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी
अमरावती : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल व डिझेल तसेच गॅस सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईला सर्वसामान्य जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे महागाई विरोधात शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेस, महिला काँग्रेसने इर्विन चौकात सोमवारी मोदी सरकारविरुद्ध पेट्रोल पंपासमाेर आंदाेलन केले.
पेट्रोल शंभर रुपये लिटरचा टप्पा पार केला आहे. डिझेल ९२ रुपये लिटर झाले. घरगुती गॅस सिलिंडर ९०० रुपयांवर पोहोचला. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा घेऊन सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाचा शहर काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवित भाजप सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी वाढती महागाई रोखण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यावेळी आंदोलनात बबलू शेखावत, युवक काँग्रेसचे नीलेश गुहे, जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष देवायनी कुर्वे, माजी महापौर वंदना कंगाले, योगिता गिरासे, जया बदरे, रोमिनी मनोहरे, दीक्षा सोनटक्के, सविता धांडे, भारती खोडस्कर, वर्षा तायडे, उषा पेंदाम, वंदना गुलालकरी, निर्मला शिवणकर, सादिक शाह, यासिर भारतीय, अब्दुल नईम, बबलू राज, संकेत श्रीखंडे, पवन मोकळकर, बबलू कदम, शुभम निभोंरकर, सागर तायडे यांचा सहभाग होता.