लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : लोकसभेत २४ जुलै रोजी मंजुरी मिळालेल्या तीन तलाक बिलाच्या निर्णयाविरुद्ध रविवार, २८ रोजी बडनेऱ्यातील मुस्लीम बांधवांनी निषेध नोंदवून निदर्शने केली. दरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त लावम्यात आला होता.बडनेरा स्थित जुनीवस्तीतील अलमास गेट येथे मुस्लीम बांधव सदर विधेयकाला विरोध दर्शविम्यासाठी एकत्र आले होते. संसदेत तीन तलाक बिलाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या निर्णयाचा विरोध दर्शविण्यासाठी बडनेऱ्यात सर्व मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून शासन निर्णयाचा निषेध केला. अर्धा तास शांततेच्या मार्गाने मुस्लिम बांधवांनी निदर्शने नोंदविली. यावेळी नगरसेवक शेख मोहम्मद इम्रान, मोहम्मद साबीर, शेख नूर, हाजी अब्दुल रशीद, सादीक अली, अजमद खॉ, हाजी इम्रान, कम्ब् ाु्रद्दीन आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते. पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्त लावला होता.
तीन तलाक विधेयकाच्या विरोधात बडनेऱ्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 1:29 AM