लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दहावा पदवी प्रदान समारंभ शनिवारी स्थानिक व्ही.एम.व्ही. परिसर कठोरा नाका येथील संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह उत्साहात पार पडला. यात विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण ४५० बी.टेक व १०६ एम. टेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणपत्र प्रदान करण्यात आली.या समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, सहसंचालक, विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डी.व्ही जाधव, विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू विलास सपकाळ, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किरण पातुरकर व महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मो. झुबेर, कुणाल टिकले, प्राचार्य आर.पी. बोरकर, विविध विद्याशाखांचे विभागप्रमुख, अधिष्ठाता, शैक्षणिक अधिष्ठाता अनंत धात्रक, परीक्षा नियंत्रक वसंत जपे आदीे उपस्थित होते. प्राचार्य आर.पी. बोरकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा वार्षिक अहवाल सादर केला.यावेळी ना. संजय धोत्रे म्हणाले, मी या संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे अगोदर स्पष्ट केले. सदोतिद विद्यार्जन करत राहून विपरीत परिस्थितीतही निर्मित क्षमता जपून समाजजीवन सुकर करण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. समस्यांच्या निराकरणासाठी विचार व चाकोरी बदलण्याचे आव्हान त्यांनी केले.विद्यार्थ्यांनी समाजाच्या गरजांसाठी नविन्यपूर्ण, सक्षम, समाधानकारक उत्तरे शोधावीत, उत्तम संशोधक व उद्योजक बनून राष्ट्र निर्मितीत हातभार लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन अनंत धात्रक व शांतनू लोही यांनी केले.हे विद्यार्थी ठरलेत प्रावीण्य श्रेणीचे मानकरी४बी.टेक. अभियांत्रिकीच्या श्रेया बोरीकर (स्थापत्य) पलक कटीरा व मो. समीर शेख (यंत्र अभियांत्रिकी), स्नेहा जावरे (विद्युत), स्रेहा तायडे (अणु विद्युत), सुखदा कुळकर्णी (संगणक विज्ञान), दिशा बात्रा (माहिती तंत्रज्ञान), रविना संगतानी (उपकरणीकरण) यांना विद्याशाखांमध्ये अव्वल क्रमांकासाठी सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. पदव्युत्तर (एम.टेक) अभियांत्रिकीच्या अव्वलस्थानी गौरव मानकर (थर्मल), संतोष कणसे (स्ट्रक्चरल), सायली राउत (ईलेक्ट्रीकल पॉवर सिस्टीम), स्वराज खंडेश्वर व वैष्णवी गुल्हाने (परिसर अभियांत्रिकी), प्रणिता मागान्ती (संगणक विज्ञान), अदिती गायगोले (अणुविद्युत), शरयू बेलसरे (जिओटेक्निकल), सुरेंद्रकुमार आगाशे (प्रोडक्शन) यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रावीण्य प्रमाणपत्राद्वारे सन्मानित करण्यात आले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:01 AM
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दहावा पदवी प्रदान समारंभ शनिवारी स्थानिक व्ही.एम.व्ही. परिसर कठोरा नाका येथील संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह उत्साहात पार पडला. यात विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण ४५० बी.टेक व १०६ एम. टेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणपत्र प्रदान करण्यात आली.
ठळक मुद्देकेंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांची उपस्थिती : ४५० बी-टेक, १०६ एम.टेक विद्यार्थ्यांचा गौरव