आॅनलाईन लोकमतमोर्शी : तालुक्यातील शिरखेड येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ मार्च रोजी शिरखेड येथील संतप्त ग्रामस्थांनी मोर्शीचे गटविकास अधिकारी कार्यालय गाठून कक्षात ठिय्या दिला. एक महिन्यात पाणीप्रश्न प्रशासनाच्यावतीने कायमस्वरूपी न सोडविल्यास अप्पर वर्धा धरणातून सोफियाला पाणीपुरवठा करणारी पाइप लाइन फोडून प्रचंड जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.शिरखेड येथे मागील चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील नागरिक, महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.शिरखेड गावाकरिता सार्वजनिक विहीर खोदण्यासाठी जि.प. पाणीपुरवठा विभागाने एक महिन्यापूर्वी तांत्रिक मंजुरात दिली. परंतु, अजूनपर्यंत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली नाही. येथील ग्रामसेवक या गंभीर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. बंद असलेली ७० गाव पाणीपुरवठा योजना शासनाने सुरू करण्यासह पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सचिन ठोके व शिरखेडच्या सरपंच सुनंदा तागडे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी कक्षात ठिय्या देण्यात आला. अखेर बीडीओ थोरात यांनी शिरखेड येथील सार्वजनिक विहीर खोदण्यास प्रशासकीय मान्यता दिली आणि ग्रामसचिवाने प्रस्ताव सादर केल्यास टँकरने गावात तात्पुरत्या पाणीपुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. ठिय्या आंदोलनात सचिन ठोके, सरपंच सुनंदा तागडे, पोलीस पाटील शेषराव खराते, माजी सरपंच सत्तार सौदागर, माजी सभापती जानराव गाडे, छत्रपती भोकरे, नीळकंठ धनाडे, शब्बीर पहेलवान, राजेंद्र पारवे, शेख कासीम, रुक्माबाई झाकर्डे, राजेंद्र झाकर्डे, प्रकाश थोरात, घनश्याम ठोके, सुनील पारवे, सारंग देशमुख, शोभा खराते, वसुधा झाकर्डे, सागर देशमुख, भास्कर निमजे, अनिल निमजे, ज्ञानेश्वर थोरात, सागर तट्टे, सतीश गायकवाड, अंकुश होलेसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले.विहिरी, बोअर आटलेगावात तीन ते चार शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. त्या विहीरींनासुद्धा पाणी राहिले नाही. पाणीपुरवठ्यासाठी जुने व नवीन केलेले बोअरसुद्धा आटले. याची पूर्वसूचना सरपंचांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिली तरी अद्याप त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही.
शिरखेडला तातडीने पाणीपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:10 PM
तालुक्यातील शिरखेड येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ मार्च रोजी शिरखेड येथील संतप्त ग्रामस्थांनी मोर्शीचे गटविकास अधिकारी कार्यालय गाठून कक्षात ठिय्या दिला
ठळक मुद्देग्रामस्थांचा ठिय्या : एक महिन्याचा अल्टिमेटम, सोफियाचा पाणीपुरवठा तोडणार