शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

शासकीय यंत्रणांनी आगीबाबत समाजात जनजागृती करावी!

By admin | Published: April 24, 2017 12:45 AM

वाढत्या उष्णतामानामुळे काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आगी लागत आहे.

पालकमंत्र्यांचे निर्देश : बचावात्मक उपाययोजना कराअमरावती : वाढत्या उष्णतामानामुळे काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आगी लागत आहे. यासंदर्भात आगीपासून नागरिकांचा बचाव करण्याकरिता व होणाऱ्या जीवित व वित्तहानी रोखण्याकरिता दक्षता घेण्याबाबत उद्योग खनिकर्म पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आवाहन केले आहे.पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा, मुख्याधिकारी सर्व नगरपरिषद यांना आगीपासून बचाव करण्याकरिता शहरस्तरावर व ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे सहकार्य घेऊन जनजागृती करण्याबाबत निर्देश दिले. तसेच राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग शहरातील रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. अशा दोषींविरुद्ध कडक कार्यवाही करावी. घराभोवती, झाडाच्या पाराभोवती किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेला केरकचरा जाळू नये. संबंधित नागरिक असे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवर पोलीस कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.वाढत्या उष्णतामानामुळे आगीपासून बचावासाठी पुढीलप्रमाणे सूचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा, सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी आगीपासून बचावासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे ना. पोटे यांनी निर्देश दिलेत. काय करावे व काय करु नये !घरोसमोरील परिसरातील किंवा गुरांच्या गोठ्याभोवती असलेला केरकचरा जाळू नये. घराच्या भोवताल किंवा गुरांच्या गोठ्याभोवती कचरा किंवा जळावू वस्तू जसे कडबा व कुटार ठेवू नये. स्वत:च्या कपड्यांना आग लागल्यास जमिनीवर लोळून विझविण्याचा प्रयत्न करावा. शेतातील धुरांवर जाळ करताना खबरदारी घ्यावी. फटाके फोडताना सार्वजनिक ठिकाणी फोडणे धोक्याचे आहे. ज्या ठिकाणी जळावू साहित्य आहे त्या ठिकाणी किंवा शेतामध्ये इतर ठिकाणी शक्यतोवर फाटके फोडू नये. घरातील जुनी विजेची तारे व उपकरणे शक्यतो बदलवून टाकावित. आपल्या घरामध्ये कामाच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग जाणून व नेहमी अडथळे विरहीत ठेवावे. घरातील कोठीवर पडकी जागा इत्यादी ठिकाणी कचरा तेलकट अथवा जळावू पदार्थ जमा करु नये. घरातील हिटर, गॅस इत्यादीपासून कपडे, पडदे व लाकडी वस्तु कमीत कमी तीन फूट लांब ठेवाव्यात. काडीपेट्या, केरोसीन, अत्तर, इस्त्री या वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवाव्यात. स्वयंपाकघरातील सिलिंडरचा रेग्युलेटर बंद ठेवावा. चुलीतील विस्तव पूर्ण विझल्याबाबत खात्री करून घ्यावी. झोपताना दिवा लांब ठेवावा किंवा बंद ठेवावा. ज्वालाग्राही वस्तू असल्यास शक्यतो दूर ठेवाव्यात. आग लागल्यास लगेच अग्निशमन दलाला टोल फ्री क्र. १०१ व कार्यालय दूरध्वनी क्र. ०७२१-२५७६४२६ व सर्व नगरपरिषद येथील दूरध्वनी क्रमांकावर तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.