पोस्ट, बँक, ई-सेवा केंद्र इत्यादी बंद पडले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व व्यवहार बंद पडले असून, नागरिकांना विनाकारण भटकंती करावी लागत आहे. या कंपन्यांचे मोठे मोठे रिचार्ज लोकांनी मारले असून ते नेट नसल्याने वाया जात आहे. हजारो नागरिकांचे आर्थिक नुकसान यामुळे होत आहे. ताबडतोब यावर तोडगा काढणे आवश्यक असून दिवसेंदिवस या कंपन्यांच्या मुघली कारभारामुळे जनतेत रोष पसरत आहे. त्याचा स्फोट होण्याआधी प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया
शिवकुमार अग्रवाल,येवदा ,जागा मालक
या कंपनीच्या कर्मचारी अधिकारी यांना सहा महिन्यांपासून वारंवार सूचना देऊनही त्यांनी कुठलेच पाउल उचलले नाही , तसेच एक महिन्याची मुदत वाढ देऊनही केवळ थापा मारण्याचे काम या कंपन्या करीत आहेत , त्या मुळे नाईलाजाने मला याचा विद्युत पुरवठा बंद करावा लागला.