शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

'पीडीएमसी'त रंगले 'रुजू नाट्य'

By admin | Published: April 05, 2015 12:14 AM

डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी हे शनिवारी अधिष्ठातापदी रुजू होण्यासाठी महाविद्यालयात गेले असता..

दिलीप जाणे म्हणतात, मीच 'डीन'पद्माकर सोमवंशींना परत पाठविलेअमरावती : डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी हे शनिवारी अधिष्ठातापदी रुजू होण्यासाठी महाविद्यालयात गेले असता कार्यरत अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी त्यांना आल्यापावली परत पाठविले. पीडीएमसीत रंगलेल्या 'रुजू नाट्य' प्रकरणाची खमंग चर्चा शिवाजी शिक्षण संस्थेत आहे.जाणे यांच्यापूर्वी पद्माकर सोमवंशी हे डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते. त्यांच्या टेबलाच्या कपाटातून कोट्यवधी रुपयांची रोकड प्राप्तीकर विभागाला आढळून आली होती. त्यानंतर शिवाजी शिक्षण संस्थेने सोमवंशी यांची चौकशी आरंभली होती. विशेष चौकशी पथकाद्वारे ही चौकशी सुरू असतानाच सोमवंशी यांना संस्थेने बडतर्फ केले. या निर्णयाविरुध्द सोमवंशी यांनी आरोग्य विद्यापीठाकडे दाद मागितली. सोमवंशी यांना रूजू करून घेण्याचे आदेश विद्यापीठाने दिले होते. शिवाजी शिक्षण संस्थेने विद्यापीठाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली होती. याप्रकरणी नाशिक आरोेग्य विद्यापीठाचे आदेश ग्राह्य धरावे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. त्याअनुषंगाने आरोग्य विद्यापीठाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून सोमवंशी यांच्या बाजूने निकाल दिला. सोमवंशी यांच्या बडतर्फीचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. त्यांना पूर्वपदी रुजू करुन सात वर्षांचे वेतन अदा करण्यात यावे, असा निर्णय विद्यापीठाने दिला. १७ मार्च रोजी सदर आदेश जारी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार शनिवारी सोमवंशी वैद्यकीय महाविद्यालयात रुजू होण्यासाठी दाखल झाले; तथापि, असा कुठलाही आदेश मला प्राप्त झालेला नाही, अशी भूमिका घेऊन प्रभारी अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी सोमवंशी यांच्याकडे पदभार सोपविण्यास नकार दिला. आरोग्य विद्यापीठाच्या निर्णयावरुन मी अधिष्ठातापदी रुजू होण्यासाठी गेलो होतो. मात्र, प्रभारी अधिष्ठाता यांना संस्थेने कळविले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता वैधानिक मार्गाने न्याय मागावा लागेल. - पद्माकर सोमवंशी,माजी अधिष्ठाता, पीडीएमसी.आम्ही संस्थेच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला होता. डीनला काढायचे असेल तर सरळ-सरळ काढूनच टाका, असेही सुचविले होते. सोमवंशी यांच्याकडून दोनदा निर्णय देण्यात आला आहे. संस्था उगीचच वेळ दवडत आहे. शैक्षणिक क्षेत्रावर त्यामुळे विपरित परिणाम झाला आहे. -दिलीप इंगोले, माजी उपाध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था.सोमवंशी हे नियमबाह्यरीत्या रुजू होण्यासाठी आले होते. त्यांना अद्यापपर्यंत आदेश प्राप्त झालेला नाही. त्यांना आदेश मिळेपर्यंत अधिष्ठातापद मीच सांभाळणार आहे. -दिलीप जाणे,प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता.