परतवाडा : अचलपूर, परतवाड्यामध्ये वीजचोरी करणाऱ्या १८ ग्राहकांवर महावितरणकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात १३ जण परतवाड्यातील, तर पाच अचलपूर शहरातील आहेत.
मुंबई येथील दक्षता पथकासह स्थानिक अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. वीज मीटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरीचा या १८ जणांनी प्रयत्न केला. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ही चोरी उघड झाली. ही कारवाई करण्याकरिता मुंबई येथील दक्षता पथक तब्बल चार दिवस परतवाड्यात मुक्कामाला होते. महावितरणकडून या सर्वांना दंडात्मक कारवाईच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. यात सर्व मिळून जवळपास १२ लाखांवर दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधितांनी हा दंड न भरल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास पोटे, सहायक अभियंता निखिल तिवारी व सिडाम आणि अचलपूरचे सहायक अभियंता नीलेश गुल्हाने यांनी ही कारवाई केली.
-------------------
वीजचोरी करणाऱ्या १८ ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंड न भरल्यास या ग्राहकांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
देविदास पोटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, परतवाडा.