वलगाव : मोठा भक्तसंप्रदाय असलेले रेवसा येथील श्री संत सद्गुरु ब्रह्मचारी महाराज यांचा यात्रा महोत्सव यंदा कोरोनासंबंधी अटी-शर्तींमुळे अतिशय साध्या पद्धतीने ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडला.
दीडशे वर्षांच्या परंपरेतील अनेक कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली. यामध्ये देखावे, स्पर्धा, मिरवणूक, रथयात्रा, ढोल-ताशे पथक, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची व्यायाम प्रात्यक्षिके, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह महाप्रसादाचा कार्यक्रम यांचा समावेश आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून यंदा विधिवत पूजा-अर्चना व त्यानंतर दररोज पहाटे ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. सचिन देव महाराज यांचे गुरुचरित्र प्रवचन झाले.
----------
गाडगेबाबांनी सुरू केली महापंगत
श्रीक्षेत्र रेवसा येथे संत गाडगे महाराजांनी महाप्रसादाची परंपरा सुरू केली. त्यामुळे येथील यात्रेला वेगळे स्वरूप आहे. ही महापंगत बघण्याकरिता व महाप्रसाद घेण्याकरिता दूरवरून नागरिकांची या ठिकाणी हजारोंच्या संख्येने गर्दी करतात.