लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास केमिकल टेक्नॉलॉजी विभाग परिसरात तो सुरक्षा रक्षकाला दिसून आला. बिबट्याचा पुन्हा वावर वाढल्याने विद्यापीठात कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्यापीठ परिसरात बिबट्याचे जोडपे असल्याचे यापूर्वी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले. त्यानंतर गत दोन महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन झाले नव्हते. मात्र, ९ आॅगस्ट रोजी बिबट केमिकल टेक्नॉलॉजी विभाग परिसरात शिकारीच्या शोधात आल्याचे दिसून आले. या परिसरातूनच बिबट गेल्याचे पुरावे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने गोळा केले आहेत. बिबट्याच्या पायांच्या ठशांचे छायाचित्र वनविभागाकडे देण्यात आले आहे.संत गाडगेबाबा विद्यापीठात बिबट्याच्या मुक्त संचार असल्याबाबत सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याविषयी विद्यापीठ प्रशासनाने वनविभागाकडे पत्रव्यवहार चालविला आहे. बिबट हे नजीकच्या जंगलातून तलाव परिसर मार्गे विद्यापीठात कुत्र्यांची शिकार करण्यासाठी येत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी केमिकल टेक्नॉलॉजी विभाग परिसरात बिबट्याचा अर्धा ते पाऊणतास मुक्त संचार असताना सुदैवाने त्याने कोणत्याही मनुष्यावर हल्ला केला नाही. याच भागात महिला मजूर वर्ग कार्यरत होता. बिबट आल्याची माहिती मिळताच सुरक्षा विभागाने तात्काळ या भागात काम करणाºया महिला मजुरांना सुरक्षित ठिकाणी हलविले. बिबट तलाव आणि जंगल भागातून विद्यापीठात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून वसतिगृहातील मुलींना रात्री उशिरा बाहेर निघण्यास मनाई केली आहे.विद्यापीठात लागले सतर्कतेचे फलकविद्यापीठ परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जागोजागी सतर्कता बाळगण्याचे फलक लावले आहेत. तलाव आणि स्टेडियम परिसरात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. झाडे-झुडपे आणि जंगल भागात निर्बंध लावण्यात आले आहेत. विद्यापीठात कामानिमित्त येणाऱ्यांना निर्मनुष्य स्थळी मनाई करण्यात आली आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात फलक लागले आहेत.बिबट्याचा मुक्त संचार पुन्हा सुरू झाला आहे. यापूर्वी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यात तो दिसून आला. वनविभागाला बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पत्र दिले.- रवींद्र सयाम, उपकुलसचिवसुरक्षा विभाग, अमरावती विद्यापीठ.
विद्यापीठात बिबट्याचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 1:29 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास केमिकल टेक्नॉलॉजी विभाग परिसरात तो सुरक्षा रक्षकाला दिसून आला. बिबट्याचा पुन्हा वावर वाढल्याने विद्यापीठात कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देपायांचे ठसे आढळले : केमिकल टेक्नॉलॉजी विभाग परिसरात वावर?