वरुड : येथील गोमती जिनिंग-प्रेसिंगमध्ये महाराष्ट्र राज्य पणन् महासंघाच्यावतीने मंगळवारपासून शासकीय कापूस खरेदीला सुरूवात करण्यात आली. खासगी व्यापारी आणि शासनाचे दर जवळपास सारखेच असून ४ हजार १०० रूपये प्रति क्विंटलने खरेदी सुरु झाली आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून कापसाची रोख रक्कम मिळते, तर पणन महासंघाकडून ती तिसऱ्या दिवशी खात्यावर वळती केली जाते. कापूस लागवडीचा खर्चसुध्दा ४ हजार १०० रूपये प्र्रतिक्विंटलच्या भावात निघत नसल्याने कापूस उत्पादकांवर आता सुलतानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरात आला असला तरी दिवाळी मात्र अंधारात गेली आहे.
कवडीमोल भावाने शासकीय कापूस खरेदी
By admin | Published: November 18, 2015 12:18 AM