लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेत २६ थर्मल स्क्रिनिंग गण, तर ३० पल्स ऑक्सिमीटरची खरेदी केली जाणार आहे. सध्या २६ थर्मल स्क्रिनिंग गण उपलब्ध झाल्या असून पल्स ऑक्सिमीटरसाठी पाठपुरावा सुरू आहे.शासनाने सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे विस्कळीत झालेली परिस्थिती टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती वाढविली आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सोबतच ग्रामीण भागातील नागरिकही कामानिमित्त झेडपीत येत असल्याने वर्दळ वाढली आहे. यामध्ये कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच अभ्यागतांसाठी प्रवेशव्दाराजवळ हॅण्डवॉशची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत, पंचायत समितीच्या कार्यालयात व पदाधिकाऱ्यांकडे येणाऱ्यांची वर्दळ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी वरील ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकांचे थर्मल स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरव्दारे तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनाने २६ थर्मल स्क्रिनिंग गणची खरेदी केली आहे, तर पल्स ऑक्सिमीटरची मागणी करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसह कर्मचाºयांची थर्मल स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरव्दारे तपासणी केली जाणार आहे.लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता आणली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वर्दळ पाहता खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार थर्मल स्क्रिनिंग गण उपलब्ध करून दिले आहेत. पल्स ऑक्सिमीटरची मागणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.- तुकाराम टेकाळे,डेप्युटी सीईओ (सामान्य प्रशासन)
थर्मल स्क्रि निंग, पल्स आॅक्सिमीटरची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 5:00 AM
शासनाने सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे विस्कळीत झालेली परिस्थिती टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती वाढविली आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सोबतच ग्रामीण भागातील नागरिकही कामानिमित्त झेडपीत येत असल्याने वर्दळ वाढली आहे. यामध्ये कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच अभ्यागतांसाठी प्रवेशव्दाराजवळ हॅण्डवॉशची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
ठळक मुद्देखबरदारी : झेडपीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना