लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने गुरुवारी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची पातळी वाढली असून प्रथमच जुलै महिन्याचा सुरवातीला धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत.मध्यप्रदेशातील भैसदेही व बापजाई भागात मंगळवारी व बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला. धरणात जून अखेरपर्यंत ४१ टक्के जलसाठा ठेवणे गरजेचे आहे. जुलै अखेरपर्यंत हाच जलसाठा ५७ टक्के ठेवणे गरजेचे आहे. मात्र, जुलैच्या पहिल्याच तारखेला धरणात ६२.५५ टक्के जलसाठा जमा झाला असल्याने बुधवारी रात्री विश्रोळी येथील पूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंटीमीटर उघडण्यात आले होते. यामधून १४.०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर सकाळी ४ वाजता या धरणाचे दरवाजे ५ सेमी उघडे ठेवण्यात आले होते.मात्र शुक्रवारी सकाळी ८ वाजता धरणाचे दोन्ही दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले आहे. आज धरणात ६० टक्के जलसाठा उपलब्ध असून जुलै अखेर पर्यंत या धरणात ५७ टक्के जलसाठा शिल्लक ठेवण्यात येते. मात्र अद्याप जुलै महिना सुरू झाला असताना सरासरी पेक्षा ही जास्त जलसाठा धरणात शिल्लक आहे. तसेच येत्या ४८ तासात सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तालुक्यात गेल्या ४८ तासांत पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात काही प्रमाणात का होईना आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच धरणात येणाऱ्या पाण्याचा आवकमुळे पुन्हा धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता पूर्णा प्रकल्पाच्या अधिकारी यांच्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.धरणाचे दोन दारे १० सेंटीमीटर उघडण्यात आले. यामधून समाधानकारक विसर्ग झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी हे दरवाजे बंद करण्यात आले आहे. मात्र पुढच्या ४८ तासांत मध्यप्रदेशातील भागात पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात.- अक्षय इरसकर,कनिष्ठ अभियंता, पूर्णा प्रकल्प
पूर्णाचे दोन दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:00 AM
मध्यप्रदेशातील भैसदेही व बापजाई भागात मंगळवारी व बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला. धरणात जून अखेरपर्यंत ४१ टक्के जलसाठा ठेवणे गरजेचे आहे. जुलै अखेरपर्यंत हाच जलसाठा ५७ टक्के ठेवणे गरजेचे आहे. मात्र, जुलैच्या पहिल्याच तारखेला धरणात ६२.५५ टक्के जलसाठा जमा झाला असल्याने बुधवारी रात्री विश्रोळी येथील पूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंटीमीटर उघडण्यात आले होते.
ठळक मुद्देजलसाठा ६० टक्के : मध्य प्रदेशमधील मुसळधार पावसाचा परिणाम