वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घराच्या प्रवेशद्वारावर कुंकुमिश्रित लाल पाणी बॉटलमध्ये भरून ठेवल्यास जनावरे थांबत नाहीत, असा समज करून घेण्याचे एक आगळेवेगळे फॅड सध्या अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. एरवी गावखेड्यात अंधश्रद्धा पसरल्याची बोंब असते. मात्र, सदर प्रकार अमरावती शहरात बऱ्यापैकी रुजला आहे. हा अंधश्रद्धेचाच भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.पावसाळ्यातील दिवसांमध्ये श्वान, वराह व गाई शहरातील गल्लोगल्ली फिरताना आढळतात. हे प्राणी कुठेही लघुशंका किंवा शौचसुद्धा करतात. बरेचदा नागरिकांच्या घरापुढील रस्त्यावर किंवा आवारात हे प्राणी बसून आपल्या विधी उरकतात. घरापुढील आवार अस्वच्छ ही जनावरे करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्राण्यांना हाकलून लावणेही इतके सोपे नसते; उलट ते अंगावर धावून जाण्याची शक्यता असते. त्यावर काही नागरिकांनी सोपा उपाय शोधला आहे. तो म्हणजे, घराच्या दरवाजावर लाल पाण्याची बॉटल लावून ठेवणे. ही लाल पाण्याची बॉटल पाहून हे प्राणी घरासमोर किंवा आवारात बसत नाही. एवढेच नव्हे तर लाल पाणी दिसल्यामुळे ते थांबतदेखील नसल्याचा समज नागरिकांनी करून घेतला आहे. मात्र, हे कितपत खरे आहे, यात खरोखर तथ्य आहे का, हा प्रकार काय आहे, हे जाणून घेतले असता, हा गैरसमज व अंधश्रद्धेचाच भाग असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.का एकत्र येतात श्वान?पावसाळा हा कुत्र्यांच्या मीलनाचा काळ. त्यामुळे मादीचा नर श्वान माग घेतात. अशावेळी मादी श्वानाने एखाद्या घरासमोर जाऊन मूत्र किंवा घाण केल्यास, त्या गंधामुळे नर प्राणी आकर्षित होऊन एका ठिकाणी जमतात. अशावेळी ते श्वानसुद्धा तेथे मूत्र किंवा घाण करून जातात.सुशिक्षितांनीही लावली बॉटलअंधश्रद्धेचे प्रमाण अशिक्षितांमध्ये अधिक असते. मात्र, लाल पाणी बॉटल प्रवेशद्वारासमोर लावणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचाच भरणा मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, जे श्वान पाळतात, त्यांच्याही घरासमोर ही लाल पाणी असलेली बॉटल आढळून येत आहे.या ठिकाणी लाल पाण्याची बॉटलजनावरांना दूर ठेवण्यासाठी लाल पाण्याची बॉटल प्रवेशद्वारावर लटकवून ठेवण्यात आल्याचे बडनेरातील माताफैल, नवीवस्ती, आदिवासीनगर, इंदिरानगर, रुक्मिणीनगर, यशोदानगर, नवाथेनगर अशा सर्वच सामाजिक, आर्थिक स्तरांतील वस्त्यांमध्ये आढळून येत आहे. या गैरसमजाला सर्वाधिक महिला आहारी गेल्या आहेत.श्वानांना या बॉटलच्या लाल पाण्याशी काही देणेघेणे नाही. हा गैरसमज खेड्यापाड्यातून शहरापर्यंत पोहोचला आहे.- शुभम सायंके, प्राणिप्रेमी.लाल पाण्याची बॉटल घरासमोर लटकविल्यास श्वान घाण करीत नाहीत. आता घरासमोर श्वान उभेसुद्धा राहत नाहीत.- नीलेश ठाकरे, नवाथेनगरकुंकवाच्या लाल पाण्याने जनावरे पळून जातात, अशा गोष्टीवर लोक विश्वास ठेवतात तरी कसे? हा अंधश्रद्धेचाच भाग आहे.- हरीश केदार, अंनिस
दारावर लाल पाण्याची बॉटल ठेवते जनावरांना दूर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 10:20 PM
घराच्या प्रवेशद्वारावर कुंकुमिश्रित लाल पाणी बॉटलमध्ये भरून ठेवल्यास जनावरे थांबत नाहीत, असा समज करून घेण्याचे एक आगळेवेगळे फॅड सध्या अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. एरवी गावखेड्यात अंधश्रद्धा पसरल्याची बोंब असते. मात्र, सदर प्रकार अमरावती शहरात बऱ्यापैकी रुजला आहे. हा अंधश्रद्धेचाच भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ठळक मुद्देघरोघरी पसरली अंधश्रद्धा : गावखेड्यातीलच नव्हे, शहरातील सुशिक्षितांनाही विळखा