यशोमती ठाकूर यांची माहिती : विकास आराखड्यांतर्गत २० कोटींच्या कामांना सुरुवातविदर्भाची प्राचिन व पहिली राजधानी, देवी रुक्मिणीसह पुराणातील पाच महासतींचे माहेर असलेली ऐतिहासिक कौंडण्यपूरनगरी तिवसा मतदारसंघात आहे, हे माझे भाग्यच! या नगरीला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. सद्यस्थितीत २० कोटींची विकासकामे प्रगतिपथावर आहेत तर २० कोटींची कामे प्रस्तावित आहेत, अशी माहिती तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली. राज्य शासनाने श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे पायाभूत नागरी सुविधा देण्यासाठी ३ डिसेंबर २०१२ अन्वये २० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे ३ वर्षांपासून कार्तिक पौर्णिमा प्रतिप्रदेला कौंडण्यपूर येथे शासकीय महापूजा करण्याची घोषणा तत्कालीन पालकमंत्री व राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यानुसार दरवर्षी शासकीय महापूजा होत आहे. कौंडण्यपूर विकास आराखड्याने या तीर्थक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे.
पुण्यभू कौंडण्यपूरला गतवैभव मिळवून देण्याचा ध्यास
By admin | Published: November 26, 2015 12:19 AM