अमरावती : कोरोना संसर्गात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्याच्या निवडणूक विभागाची तयारी झालेली आहे. १५ तारखेच्या मतदानात एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान वाढल्यास किंवा संशयित तसेच संक्रमित मतदार असल्यास त्याला मतदान संपण्याच्या म्हणजेच सायंकाळी ५.३० च्या अर्धा तास अगोदर मतदान करता येणार आहे. प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आयोगाद्वारे ही सुविधा देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात ५३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १,८६० मतदान केंद्रांवर १० लाखांवर नागरिक १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान करणार आहेत. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह, क्वारंटाईन तसेच शरीराचे तापमान वाढ झालेल्या व्यक्तीलाही मतदान करता येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक विलगीकरण कक्षही राहणार आहे. मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांचाही संशयित वाटल्यास त्यांनाही या कक्षात ठेवले जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले. याशिवाय मतदान केंद्र मतदानाचे अगोदरचे दिवशी व मतदान झाल्याचे दुसऱ्या दिवशी सॅनिटाईझ केले जाईल. मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराने व कर्मचाऱ्याने मास्क लावूण येणे बंधनकारक आहे. एखादा मतदार मास्क लावून न आल्यास, त्याला मास्कदेखील पुरविण्यात येणार आहे. मतदारांनी रांगेत फिजिकल डिस्टन्स पाळणे अनिवार्य राहणार आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालनदेखील बंधनकारक असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
बॉक्स
ओळख पटविण्यासाठी क्षणभर हटविणार मास्क
मतदान केंद्रावर मतदाराला त्याची ओळख छायाचित्र असलेल्या ओळखपत्राच्या आधारे पटवावी लागणार आहे. याशिवाय मतदानासाठी आलेला मतदार तोच आहे, यासाठी त्यांना मतदान अधिकाऱ्यासमोर क्षणभर मास्क हटवावा लागणार आहे. यावेळी मतदान अधिकाऱ्यासमोर एकावेळी एकच मतदार राहील, अशी व्यवस्था कक्षात राहणार आहे.
बॉक्स
मतदान केंद्रावर महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
मतदारांना सुरक्षित मतदान करता यावे, यासाठी पुरुष अन् महिला मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था राहील. शक्य असल्यास बूथ ॲपचा वापर करण्याचेही आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. मतदान केंद्राच्या बाहेर व मतदान करण्यापूर्वी प्रत्येक मतदाराला त्याचे हाताला सॅनिटायझर लावावे लागणार आहे. या ठिकाणी कोरोनाविषयक जागृतीही केली जाईल.
बॉक्स
मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग
मतदान केंद्राची जागा, साहित्य व मतदानाच्या एक दिवस अगोदर सॅनिटाईझ करण्यात येईल. मतदान केंद्राचे प्रवेशाचे ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल. याच ठिकाणी आरोग्य पथकाद्वारे मतदाराचे तापमान तपासले जाणार आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार रांगेत उभ्या असलेल्या मतदारांसाठी प्रत्येक दोन फूट अंतरावर १५ ते २० मतदारांसाठी इनमार्कींंग सर्कल राहणार आहे.
कोट
००००००००००००००००
०००००००००००००००००००००००
००००००००००००००००००००००००००००००००००
- वर्षा पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी