अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे वर्षभर्रापूर्वी सापडलेली चांदीची १३८ नाणी आसेगाव पोलिसांनी अद्यापही अचलपूर कोषागारात जमा केलेलीनाहीत. सापडल्यानंतर पंधरा दिवसांत कोषागारात जमा करण्याचा दंडक असतानाही ती आसेगाव पोलिसांनी वर्षभरापासून स्वत:च्या कस्टडीतच ठेवली आहेत.या नाण्यांंमध्ये राणी व्हिक्टोरिया, जॉर्ज किंग यांची भावमुद्रा असलेल्या नाण्यांचा समावेश आहे. असदपूर येथील कृष्णा म्हाला यांनी त्यांचे जुने घर पाडले. या घराच्या मातीच्या ढिगाऱ्यावर खेळत असलेल्या मुलांना चांदीचे पैसे आढळून आले. तेव्हा ३० मार्च २०१७ म्हाला यांनी या मातीत पैशांचा शोध घेतला. मातीत सापडलेली चांदीची १३० नाणी म्हाला यांनी आसेगाव पोलिसांच्या स्वाधीन केली. दरम्यान अचलपूर एसडीओ डॉ. व्यंकट राहोड, ठाणेदार अजय आखरे, इतिहास अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांच्या भेटीदरम्यान आणखी आठ नाणी सापडली. तेव्हापासून ही नाणी आसेगाव पोलीस ठाण्यातच पडून आहेत.ही नाणी मौल्यवान वस्तूंमध्ये मोडतात. जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत ती ठाणेदारांनी अचलपूर कोषागारात जमा करायला हवी होते.- भूपेंद्र खरपीकर, कोषागार अधिकारी, अचलपूरयासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, जिल्हा कोषागारात ते ठेवण्याची व्यवस्था नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नागपूर येथील पुरातत्त्व विभागाला कळविले आहे. अद्याप निर्णय झालेला नाही.- अजय आखरे, ठाणेदार, आसेगाव पोलीस ठाणे
राणी व्हिक्टोरिया, जॉर्ज किंगच्या मुद्रा असलेली नाणी अद्यापी आसेगाव पोलिसांच्याच कस्टडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 11:37 AM
अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे वर्षभर्रापूर्वी सापडलेली चांदीची १३८ नाणी आसेगाव पोलिसांनी अद्यापही अचलपूर कोषागारात जमा केलेलीनाहीत.
ठळक मुद्देघराच्या मातीच्या ढिगाऱ्यावर वर्षभरापूर्वी सापडली होती १३८ चांदीची नाणी