लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथील आदिवासी फासे पारधी समाज समितीच्या ‘प्रश्नचिन्ह’ अनाथ व दुर्लक्षित बालकांच्या आश्रमशाळेस शैक्षणिक उपयोगी साहित्य प्रदान करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक जयंत वडते, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, सम कन्सेप्ट कंपनीचे बालकृष्ण, आयबॉलचे गिरीष पाटील, कर्मचारी संघटनेचे महासचिव विलास सातपुते, मागासवर्गिय संघटनेचे अध्यक्ष नितीन कोळी, रवींद्र सरोदे, प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचे सर्वेसर्वा मतीन भोसले आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक यांच्या योगदानातून दोन लक्ष ११ हजार सहयोग राशी देण्यात आले.डजिटल अभ्यासक्रम संच बहालपुणे येथील सम कन्सेप्ट टेक्नालॉजीतर्फे लॅपटॉप, कर्मचाºयांच्या सहकार्यातून दोन संगणक व एक प्रोजेक्टर तसेच आयबॉल कंपनी व कॉम्पकिन इलर्निंग सॉफ्टवेअरतर्फे इयत्ता १ ते १० पर्यत डिजिटल अभ्यासक्रमाचा संच कुलगुरुंच्या हस्ते 'प्रश्नचिन्ह' या आश्रमशाळेला हस्तांतरित करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालन संजय ढाकुलकर तर आभार प्रदर्शन विलास सातपुते यांनी केले. यावेळी पद्मा चांदेकर, नीलेश वंदे, दिलीप पाटील, सतिश मानकर, प्रेम मंडपे, विठ्ठल मरापे, प्रफ्फुल ठाकरे, सतिश लोखंडे, राजू इंगोले, मुरलीधर चिरुलकर, संतोष मालधुरे आदी उपस्थित होते.दुर्लक्षित समाज घटकाच्या शिक्षणासाठी प्रयत्नकुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे दुर्लक्षित समाज घटकांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. दुर्लक्षित घटक हा विविध माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल, याचे नियोजन केले जात आहे. मतीन भोसले यांच्या कार्यांची प्रशंसा करताना त्यांनी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या सामाजिक कार्याच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल संघटनेचे कौतुक केले.
विद्यापीठ कर्मचाºयांकडून ‘प्रश्नचिन्ह’ची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:49 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथील आदिवासी फासे पारधी समाज समितीच्या....
ठळक मुद्देसामाजिक दायित्व : आश्रमशाळेस लॅपटॉप, दोन संगणक, एक प्रोजेक्टर भेट