शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

‘विशाखा’वर प्रश्नचिन्ह !

By admin | Published: May 20, 2017 12:47 AM

कंत्राटी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांचेविरुद्ध महापालिका कर्मचाऱ्याच्या मानसिक छळ

‘सदार’ प्रकरण : खुलासा मागविल्याने वेगळे वळण लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कंत्राटी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांचेविरुद्ध महापालिका कर्मचाऱ्याच्या मानसिक छळ प्रकरणात विशाखा समितीच्या कार्यक्षमता आणि उपयोगितेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. आयुक्तांनी या प्रकरणात विशाखा समितीकडूनच खुलासा मागविल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याने सदार यांच्या विरोधात मानसिक छळाची तक्रार केली होती. यात अंतिम निर्णय घेत सदार यांना समज देण्याची शिफारस विशाखा समितीने केली होती. मात्र या प्रकरणातील पुरावे हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आले आहेत, अशी टिप्पणी लिहून आपले कार्य संपले, अशा आविर्भावात विशाखा समितीने हे प्रकरण तब्बल १० महिने दडवून ठेवले. पुरावे हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आले, अशी टिप्पणी करताना किंवा निष्कर्ष नोंदविताना समितीने या पुराव्याबाबत चौकशी करावी किंवा चौकशी करण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले नाही. सदारांविरोधातील या प्रकरणात विशाखा समिती मुळापर्यंत पोहोचली नाही. एकीकडे ती तक्रारकर्ती महिला पुरावे देऊ शकली नाही, असे म्हणायचे तर दुसरीकडे या प्रकरणातील पुरावे हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आल्याचा निष्कर्ष नोंदवायचा, मात्र हा प्रकार उघड करण्यासाठी किंवा पुरावे नाहीसे केले, कुणी ढवळाढवळ केली, याबाबत आयुक्तांकडे जावून मंथनही करायचे नाही, निष्कर्ष काढून मोकळे व्हायचे, अशी दुटप्पी भूमिका ‘विशाखा’ने घेतली. त्याच आधारे आयुक्तांनी जीएडीला निर्देश देऊन या प्रकरणातील तथ्य उघडकीस आणण्यासाठी विशाखा समितीला विचारणा केली आहे. त्याचबरोबर १० महिने हे प्रकरण फाईलबंद का राहिले, यावरूनही संशयाचे मळभ दाटले आहे.