सोमवारी चर्चा : सुनील देशमुखांनी सादर केला तारांकित प्रश्नअमरावती : शहरात उत्तम दर्जाची मोबाईल सेवा मिळावी, यासाठी उभारण्यात आलेल्या १५२ टॉवर्सच्या अुनषंगाने आ. सुनील देशमुख यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशात तारांकित प्रश्न दाखल करुन मुख्यमंत्र्यांच्या विभागावरच बोट ठेवले. सोमवारी ६ एप्रिल रोजी पहिल्याच टप्प्यात अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारणीचा विषय विधिमंडळात चर्चिला जाणार असल्याने महापालिका प्रशासनाला आवश्यक ती माहिती घेऊन येण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.शहरात अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारणीसंदर्भात आ. सुनील देशमुख यांनी सादर केलेल्या तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने महापालिकेकडून हवी असलेली माहिती अधिवेशन सुरु होण्यापूर्वी संबंधित विभागाला प्राप्त व्हावी, अशा सूचना नगरविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवारी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त विनायक औगड, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी सुरेंद्र कांबळे, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पीठे, महेश देशमुख आदींनी मोबाईल टॉवर्स संदर्भात आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याची कसरत चालविली आहे. नगरविकास खाते मुुख्यमंत्र्यांकडे असल्याने शहरातील मोबाईल टॉवर्ससंदर्भातील माहिती अचूक असावी, यासाठी रविवारच्या सुटीच्या दिवशीदेखील आयुक्त डोंगरे महापालिकेत आर्वजून उपस्थित होते. मोबाईल टॉवर्सचा विषय काही वर्षांपासून गाजतो आहे. यामागची कारणे जाणून घेण्याकरिताच तारांकित प्रश्न मांडला आहे. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. सकारात्मक चर्चेअंती अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीसंदर्भात राज्यासाठी नवीन धोरण निश्चित होईल.- सुनील देशमुख, आमदार, अमरावती.
अनधिकृत मोबाईल टॉवरचा प्रश्न विधिमंडळात
By admin | Published: April 06, 2015 12:26 AM