अमरावती : जिल्ह्यात सुरुवातीला शहरातील ११ खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी दिली होती. त्यात १९,९८० नागरिकांचे लसीकरण झाले. दरम्यान लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने ही प्रक्रिया बारगळली आहे. आता चार महिन्यांपासून खासगी हॉस्पिटलमधील कोरोना लसीकरण बंद असल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयकांनी दिली.
कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. किंबहुना हा प्रभावी उपाय आहे. यासाठी जिल्ह्यात १६ ऑगस्टपासून टप्पानिहाय लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला हेल्थ केअर वर्कर व त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले व त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी लसींचा पुरवठा समाधानकारक होता व केंद्रांवर मोफत लसींसाठी रांगा लागायच्या यामुळे शासनाद्वारा खासगीतही २५० रुपये डोस याप्रमाणे लसीकरणास मान्यता दिली. यात कोविशिल्ड १९,५०० व कोव्हॅक्सिनचे ४८० डोस देण्यात आले. मात्र, नंतर लसीच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याने व खासगी हॉस्पिटलचे डिपॉझिटदेखील वाढविण्यात आले. ही प्रक्रिया तीन ते चार महिन्यांपासून टप्प पडलेली आहे.
पाईंटर
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस : ५,२७,९८७
दुसरा डोस : १,७९,८०८
पाईंटर
कोविशिल्ड : १९,५००
कोव्हॅक्सिन ४८०
बॉक्स
शासकीय रुग्णालयात का नाही?
१) शासकीत लसीकरण केंद्रात मोफत नस मिळते मात्र, या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते व तासनतास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे खासगी केंद्रात जाऊन लस घेतली.
२) शासकीय लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून रांगा व फिजिकल डिस्टन्सिंगच्या अभावामुळे खासगी केंद्रातील लसीकरणाला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले.
३) प्रकृतीच्या कारणांमुळे शासकीय केंद्रावरील रांगांत तासन्तास उभे राहणे शक्य नसल्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी खासगी केंद्रात लसीकरण केलेले आहे.
बॉक्स
खासगी रुग्णालयांना कंपनीस्तरावर पुरवठा
सुरुवातीच्या काळात खासगी रुग्णालयांना शासनाद्वारा पुरवठा करण्यात आला. आता तो बंद करण्यात आलेला आहे. लसीकरण समन्वयकांच्या माहितीनुसार याकरिता त्या रुग्णालयांना वाढीव डिपॉझिट द्यावे लागते. याशिवाय नव्या गाईडलाईनुसार कोविशिल्ड ५८० रुपये व कोव्हॅक्सिनचे डोस १,१०० रुपयांना पडणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या शहरातील एकाही खासगी केंद्रावर लसीकरण होत नाही.
कोट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासकीय केंद्रांवर रांगा असल्याने कोरोना संसर्गाची भीती वाटते त्यामुळे आम्ही खासगी केंद्रातून लसीकरण केलेले आहे.
- सुलोचना पाटील,
गृहिणी
कोट
शासकिय केंद्रांवर पहाटेपासून रांगा लागत आहे. प्रकृतीमुळे तासनतास उभे राहणे शक्य होत नाही. पैसे मोजण्याची तयारी असतांना खासगीत लस उपलब्ध नाही.
- सीमा काळे,
गृहिणी