अमरावती : यंदा रबीचे पेरणीक्षेत्र सरासरी क्षेत्र उच्चांकी १२४.७६ टक्क्यांवर व दशकात पहिल्यांदाच रबीचे पीक कर्जवाटप ५५ टक्क्यांवर पोहोचल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
यंदा रबी पेरणीकरिता कृषी विभागाने १ लाख ४५ हजार १८१ हेक्टर सरासरी क्षेत्र जिल्ह्याकरिता प्रस्तावित केले होते. प्रत्यक्षात अंतिम अहवालापर्यंत १ लाख ८१ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. ही सरासरी १२४.७६ टक्के आहे. यंदा पावसाळ्यात झालेल्या सरासरीपेक्षा अधिक पावसाने जमिनीत मोठ्या प्रमाणात आर्द्रता आहे. त्यामुळे जिरायती हरभऱ्याचे उच्चांकी पेरणी क्षेत्र आहे. याशिवाय सिंचन विहिरीलाही भरपूर पाणी असल्याने जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत गव्हाची पेरणी झालेली आहे.
कृषी विभागाच्या अंतिम संयुक्त अहवालानुसार, रबी ज्वारीचे ५९.८० हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय गव्हाचे ५०, ४७६ हेक्टर, मक्याचे १,०९१ हेक्टर, हरभºयाचे १,२२,३१८ हेक्टर, करडई २ हेक्टर, जवस ८ हेक्टर व इतर गळित पिकांची १० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.
धामणगाव तालुक्यात सर्वाधिक १७३.८० टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे. चांदूर बाजार तालुक्यात १५७ टक्के, धारणी १४७ टक्के, नांदगाव खंडेश्वर १४४ टक्के, चांदूर रेल्वे १३५ टक्के, तिवसा १३१ टक्के, अंजनगाव सुुर्जी १३१ टक्के, अचलपूर १२६ टक्के, दर्यापूर १०५ टक्के, भातकुली १०२ टक्के, अमरावती ११६ टक्के, चिखलदरा ९३ टक्के, मोर्शी ८४ टक्के, तर वरूड तालुक्यात ९२ टक्के क्षेत्रात पेरणी झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
पाच वर्षात पहिल्यांदा बँकांचा हात मोकळा
* जिल्ह्यात कर्जमाफीचा १,१३,३६९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात प्रत्यक्ष लाभ पोहोचल्याने सात-बारा कोरा झाला व रबीचे कर्जवाटप उच्चांकी ५५ टक्के झाले आहे
*राष्ट्रीयीकृत बँकांनी २२,६२४ शेतकऱ्यांना २३२.६१ कोटी म्हणजेच लक्ष्यांकाच्या ७९ टक्के व ग्रामीण बँकांनी १३५ शेतकऱ्यांना २.१९ कोटींचे वाटप केले. ही टक्केवारीदेखील ७९ आहे. जिल्हा बँकेचे वाटप मात्र निरंक आहे.