आॅनलाईन लोकमतअमरावती : देशात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांच्या आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा, शांतीतूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मौलाना एजाज अहमद असलम यांनी येथे केले. येथील टाऊनहॉलमध्ये जमात-ए-इस्लामी हिन्दतर्फे आयोजित ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.मानसिक, आध्यात्मिक समाधान. सर्व जाती-धर्माच्या, सर्व वर्गांच्या तसेच सर्व स्तरातील घटकांमध्ये शांती, सुरक्षितता कायम करणे अर्थात् शांती. ती प्रस्थपित करण्यासाठी समाज व देशातील अस्वस्थता, अराजकता, अध:पतन संपुष्टात आणणे, देशवासीयांमध्ये बंधुत्व, मैत्री, प्रेम, एकमेकांप्रति सन्मान, सर्वांसाठी न्याय, समता, धार्मिक सहिष्णुता वाढीस लावणे तसेच देशवासीयांच्या भौतिक, आध्यात्मिक आणि नैतिक प्रगतीसाठी समाजप्रबोधन करणे, वैचारिक व व्यावहारिक स्वैराचार, दुराचारातून मुक्ती तसेच जीवनात खºया अर्थाने यश संपादन करणे यासंबंधी मौलिक मार्गदर्शन नौशाद उस्मान यांनी केले.समता व न्यायावर आधारित व्यवस्थेच्या निर्मितीसाठी सामाजिक परिवर्तनातून सकारात्मक क्रांतीसाठी झटणाºया उदारवादी जमात-ए-इस्लमी हिंद, महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यभर जनजागरण अभियान राबवीत आहे. ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ असे शीर्षक असलेल्या या अभियानांतर्गत राज्यभरातील ६०० ठिकाणांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.सदर सोहळ्याला अमरावती विभागातील मुस्लिम पुरुष आणि महिला उपस्थित होत्या. मुस्लिमेत धर्मातील लोकांची दखलनीय उपस्थिती हे या आयोजनाचे वैश्ष्ठ्यि ठरले. व्यासपीठावर जमात-ए-इस्लामी हिंदचे अमरावती जिल्हाध्यक्ष अहमद मोहसीन शेख उपस्थित होते. काजी लईक अहमद यांनी सुरेख केले. शहर अध्यक्ष रफीक अहमद खान यांनी आभार व्यक्त केले.जनजागरण अभियानात विविध कार्यक्रमजमात-ए-इस्लामी हिन्दच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ या जनजागरण अभियानात अनेक ठिकाणी जाहीर सभा, परिसंवाद, चर्चासत्र, कॉर्नर मीटिंग, पथनाट्य, शाळा व महाविद्यालयांमध्ये बौद्धिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, प्रदर्शन, सामूहिक भेटी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
देशाच्या प्रगतीसाठी जातीय सलोखा राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:28 PM
देशात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांच्या आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा, शांतीतूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मौलाना एजाज अहमद असलम यांनी येथे केले.
ठळक मुद्देमौलाना एजाज अहमद असलम : ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’