शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

शहरात जडीबुटी व्यावसायिकांचे रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:49 PM

जडीबुटी व्यवसायाआड नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरात पुढे येत आहे. एका जडीबुटी व्यवसायीकाने महागडे चारचाकी वाहन खरेदी केल्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार एका व्यक्तीने पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे पाच दिवसांपूर्वी केली आहे.

ठळक मुद्देमुसाफीर रजिस्टरमध्ये नोंदच नाही : पोलीस उपायुक्तांना एक तक्रार प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जडीबुटी व्यवसायाआड नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरात पुढे येत आहे. एका जडीबुटी व्यवसायीकाने महागडे चारचाकी वाहन खरेदी केल्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार एका व्यक्तीने पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे पाच दिवसांपूर्वी केली आहे.परराज्यातून शहरात दाखल झालेले जडीबुटी व्यावसायिक कुठल्याही जागेवर अतिक्रमण करून जडीबुटीचा व्यवसाय थाटतात. झोपडी टाकून विविध जडीबुटींची रस्त्यावरच विक्री करतात.दीर्घ आजार, बाळ होत नाही, लैंगिक समस्या, शक्तीवर्धक औषधीसंबंधित अनेक जण जडीबुटी व्यावसायीकांकडे जातात. मात्र, जडीबुटी व्यावसायिक ग्राहकांच्या नेमक्या कमजोरीचाच लाभ घेत त्यांच्याकडून पैसे ऐठतात. यातील काही नागरिकांना जडीबुटीचा थोडा लाभ व्हायला लागला, की त्यांच्यावर विश्वासही बसतो. मात्र, हळूहळू हे जडीबुटी व्यावसायिक त्याच ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपली दिशाभूल व फसवणूक झाल्याचे कळल्यावरही ते ग्राहक बदमानी होईल, या भीतीपोेटी पोलीस तक्रारसुद्धा करीत नाहीत. काही वर्षांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत जडीबुटी व्यावसायासंदर्भात दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ग्रामीण भागातही जडीबुटी व्यावसायिकांच्या विरोधात तक्रारी दाखल आहेत. हे जडीबुडी व्यावसायिक ग्राहकांच्या समस्यांचा लाभ घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये ऐठत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. सहजरीत्या पैसे निघत नसेल, तर हे व्यावसायिक ब्लॅकमेलसुद्धा करीत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. शहरातील एका व्यक्तीने पाच ते सहा दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे जडीबुटी व्यवसायाकाविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यामध्ये जडीबुटी चालकाजवळ महागडे वाहन खरेदी केल्याचे नमूद असून, हे व्यावसायिक इतक्या महागडे वाहन खरेदी करण्यासाठी काही तरी अवैध कामे करीत असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हपोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात मुसाफीर रजीस्टर असून जे व्यक्ती परराज्यातून अमरावतीत आलेत, त्यांच्या नोंदी मुसाफीर रजीस्टरवर घ्यावा लागतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मुसाफीर रजीस्टरवर एकही नोंद झाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे यासंबंधित काम पाहणाऱ्यांच्या कार्यप्रणाली प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.१९ बंदुका जप्तकाही वर्षांपूर्वी बंदुक नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असताना १९ जडीबुटी व्यावसायिकांजवळ बंदुकीचे परवाने आढळून आलेत तेव्हा त्या बंदुका पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यामुळे या व्यवसायीकांजवळ बंदुकीचे परवाने असल्याचे निदर्शनास आले आहे.एका व्यक्तीची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामध्ये एका व्यावसायिकाने चारचाकी वाहन खरेदी केले असून, त्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने चौकशी सुरू आहे.- चिन्मय पंडित,पोलीस उपायुक्त