लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिवटेकडीवर विशिष्ट समुदाय व महापालिका कर्मचारी यांच्यात राडा झाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रचंड खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोचल्यानंतर गर्दी पांगवताना पळापळ अन् एकच गोंधळ उडाला. यादरम्यान एका पोलिसांसह चौघे किरकोळ जखमी झाले.शिवटेकडीवर बुधवारी रात्री विशिष्ट समुदायाचा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे प्रचंड गर्दी उसळली होती. यादरम्यान एक तरुण महिलेला घेऊन दुचाकीने शिवटेकडीवर जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला तेथे तैनात महापालिका महिला कर्मचाºयांनी रोखले असता, त्याने वाद घातला. यावेळी गर्दी जमली. तरुण व महिला कर्मचारी यांच्यात वाद उफाळला आणि पुरुषांनी हस्तक्षेप करीत हाणामारी सुरू केली. या घटनेच्या माहितीवरून फे्रजरपुरा पोलिसांसह क्यूआरटी पथक पोहोचले. त्यांनी गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केल्यानंतर अचानक धावपळ सुरू झाल्याने अनेक जण खाली कोसळले. यामध्ये फे्रजरपुºयाच्या पोलीस कर्मचाºयासह विशेष समुदायातील तिघे किरकोळ जखमी झाले. तीनपैकी एका जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातसुद्धा नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांच्यासह पोहोचलेल्या ताफ्याने तेथील गर्दी कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्री उशिरापर्यंत प्रकरणाची धग कायम होती.दगडफेक, लाठीचार्जची चर्चाशिवटेकडीवर महापालिकेच्या महिला कर्मचारी खाकी साडीमध्ये असल्यामुळे विशिष्ट समुदायातील नागरिकांना पोलिसांशी वाद झाल्याचा गैरसमज झाला. यातूनच महिला पोलिसांनी मारहाण केल्याच्या कारणावरून शिवटेकडीवर शेकडो पुरुष व महिला गोळा झाल्या. कथित मारहाणीला प्रत्युत्तर म्हणून काहींनी पोलिसांवर दगड फेकले आणि त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची चर्चा आहे. काही नागरिकांनी शिवटेकडीवरील पोलीस चौकीला लाथा मारल्याचेही वृत्त आहे. पळापळीनंतर तेथे दुचाकी, चपला, दगड इतस्त: रस्त्यावर पडल्या होत्या.शिवटेकडीवर धार्मिक कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान एकाने दुचाकी घेऊन शिवटेकडीवर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महापालिका कर्मचाºयांनी रोखले. त्यानंतर गोंधळ उडाला. पोलिसांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली.- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा
शिवटेकडीवर राडा; पोलिसासह चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:43 PM
शिवटेकडीवर विशिष्ट समुदाय व महापालिका कर्मचारी यांच्यात राडा झाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रचंड खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोचल्यानंतर गर्दी पांगवताना पळापळ अन् एकच गोंधळ उडाला. यादरम्यान एका पोलिसांसह चौघे किरकोळ जखमी झाले.
ठळक मुद्देपळापळ अन् एकच गोंधळ : विशिष्ट समुदाय-मनपा कर्मचाऱ्यांतील वादानंतर तणाव