फोटो पी १५ येसुर्णा
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील येसुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी लसीकरणादरम्यान उसळलेल्या गर्दीत एकच राडा झाला. यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काचाही फुटल्यात. केंद्रावर उसळलेल्या गर्दीने परिस्थिती चिघळत असतानाच पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत. पोलीस बंदोबस्तानंतर लसीकरण सुरळीत सुरू झाले.
१५ मे रोजी येसुर्णा प्राथमिक केंद्रावर कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्याकरिता लोक जमले होते. यात शनिवारी २०० डोस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजेपर्यंत ५० लोकांना डोसही दिल्या गेला. दरम्यान गर्दी वाढली. लोकांची लोटालोट सुरू झाली. यातच त्या काचा फुटल्यात. गोंधळ उडाला. वैद्यकीय अधिकारी प्रवीण कोरडे परिस्थिती हाताळत असतानाच पोलीसही केंद्रावर पोहचल्यामुळे गोंधळासह लोटालाटी थांबली. उपस्थितांनी शांततेत लस घेतली.
कोट
पोलिसांना आदल्या दिवशीच कळविण्यात आले होते. काचा लोकांनी फोडल्या नाहीत. उसळलेल्या गर्दीतील लोटालाटीत अनावधानाने धक्का लागून त्या फुटल्या आहेत.
- प्रवीण कोरडे,
वैद्यकीय अधिकारी, येसुर्णा पीएचसी