आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रतीक्षा मेहत्रे हत्याप्रकरणातील आरोपी राहुल भडला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजापेठ पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांचे बयाण नोंदविले असून, या गंभीर गुन्ह्याच्या तपासकार्यासाठी न्यायालयाने पोलीस कोठडीसाठी वाढ दिली आहे.मूळचा अंजनगाव सुर्जीतील रहिवासी राहुल भड याने प्रेमविवाहानंतर निर्माण झालेल्या वादातून पत्नी प्रतीक्षाची हत्या केली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, पोलिसांचे कसून तपासकार्य सुरू आहे. मंगळवारी राहुल भडची पोलीस कोठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर तीन दिवसांची वाढ मिळाली आहे. राजापेठ पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांचे बयाण नोंदविले. त्यामध्ये प्रतीक्षाचे वडील, तिची बहीण, राहुल व प्रतीक्षाच्या विवाहाचे साक्षीदार, नोटरी, लग्न लावून देणारे पुरोहित, प्रतीक्षाची मैत्रीण आदींचा समावेश आहे.या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तपासकार्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता होती. तशी मागणी न्यायालयात केल्यानंतर आरोपी राहुल भडच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ मिळाली आहे.- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे.
राहुलच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:09 PM
प्रतीक्षा मेहत्रे हत्याप्रकरणातील आरोपी राहुल भडला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठळक मुद्देप्रतीक्षा हत्याकांड : आतापर्यंत १४ जणांचे नोंदविले बयाण