ठाणेदार मगन मेहते यांची कारवाई
५ हजारांचा मुद्देमाल जप्त
चांदूर रेल्वे : शहरात सुरू असलेल्या वरली मटका अड्ड्यावर शुक्रवारी धाड टाकण्यात आली. ही कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात दुपारी १२.३० वाजता करण्यात आली.
चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र सतत सुरू असून, याच दरम्यान वरली मटका अड्ड्यावर कारवाई चांदूर रेल्वे पोलिसांनी केली. या कारवाईत ५,२३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी बाब्या ऊर्फ भूषण कमलनयन गणेडीवाल याला आठवडी बाजार परिसरातून ताब्यात घेतले. यानंतर याचे साथीदार मिलिंदनगरात असल्याची माहिती आरोपीने दिली. यावरून तेथे धाड टाकली असता, तेथून बाल्या ऊर्फ महेश झिंगरे याला ताब्यात घेतले व तेथून तिसरा आरोपी सचिन वानखडे पसार झाला. तिघांविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा १२ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईत ठाणेदार मगन मेहते, पोलीस जमादार शिवाजी घुगे, नायक पोलीस अंमलदार विनोद वासेकर, चालक पंकज शेंडे, पोलीस अंमलदार मनोज वानखडे यांचा समावेश आहे.